अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या आरोपींना गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देवरी व पोलीस ठाणे नवेगावबांध पोलीसांची संयुक्त कारवाई केली आहे. तसेच अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकुण 34 गोवंशीय जनावरांची सुटका , गाई-बैल, टाटा आईसर ट्रक असा एकूण 15,10,000/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.

➡️ आगामी कालावधीत येणारा – गणेशोत्सव व इतर सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हददीत अवैधरित्या बेकायदेशीर धंदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे यांनी याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते.

➡️ या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या आदेशान्वये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नवेगावबांध पोलीसांची अवैधरीत्या चालणाऱ्या धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु केली आहे.

➡️ या अनुषंगाने दिनांक 09/09/2023 रोजी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर सा देवरी व त्यांच्या पथकाने दिलेल्या माहिती वरून एक टाटा आइसर ट्रक मध्ये अवैधरित्या गोवंश जनावरांना कोंबून कोहमारा नवेगावबांध मार्गे नागपूरकडे नेणार आहेत. त्या आधारे पो. स्टे. नवेगावबांध येथील पोलिस नवेगावबांध पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी करीत असताना पहाटे 04.45 वा. च्या सुमारास कोहामारा कडून नवेगावबांध दिशेने जाणारा एक टाटा ऑइसर क्रमांक सी जी 08 एu 0956 हा ट्रक येताना दिसल्याने पोलिसांनी त्या वाहनाला थांबण्याचा इशारा केला.ट्रक चालकाने ट्रक थाबविले असता ट्रकची पाहाणी केली तर ट्रक च्या डाल्यामध्ये एकूण 34 गोवंश जनावरे मिळून आली. सदरची 34 गोवंश जनावरांची अवैधरीत्या कत्तलीकरीता निर्दयतेने, चाऱ्या पाण्या विना कोंबून बंदिस्त करून वाहतूक करीत असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने पोलिसांनी सदरचा ट्रक व त्यातील 34 गोवंश जनावरे असा एकूण 15,10,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

➡️ 34 गोवंशीय जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता गौशाळेत दाखल करण्यात आली. सदर प्रकरणी टाटा आईसर ट्रक चालक व क्लिनर यांचेविरुध्द पोलीस ठाणे नवेगावबांध येथे अप.क्र. 78/2023 भारतीय दंड विधान कलम 279, सह कलम 11(1),(ड)(इ) (फ) प्रा.छ. प्रति. अधि. सह कलम 5 ए, बी,9 प्रा.स.अधि. 1960अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन नवेगावबांध येथील पोलीस करीत आहेत.

  ➡️  सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. संकेत देवळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नवेगावबांध चे ठाणेदार स पो.नि. संजय पांढरे पो.उप.नि. मंगेश वानखडे, पोहवा सोनटके, दहिफळे, पोलीस नाईक जितेंद्र कटरे, पोशि  सोनु नागपुरे, चा.पो.हवा. शाकीर शेख यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट