उपसंपादक – रणजित मस्के
सोलापूर :
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत मी वस्ती सुरजवळगे येथील तक्रारदार श्रीमती भानुबाई अयोगसिद्ध ख्यामगोंडे यांचे घरातून दिनांक 20/08/2022 रोजी रात्री कडी कोयंडा उचकटून सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरुन नेले तसेच अज्ञात चोरटयाने परिसरातील 5 घरे फोडून एकूण 1,57,000/- रु. सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी केला होता. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक, सो यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना तपास करणेबाबत आदेश दिले होते.
सदर घटनेबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गुरनं 478/ 2022 भादंवि क. 457, 380 प्रमाणे दिनांक 21/08/2022 रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि धनंजय पोरे हे करीत आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनंजय पोरे व त्यांचे पथकाने सदर घरफोडी गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवून गुन्हयाचे तपासकामी गोपनिय माहिती प्राप्त केली. तसेच नमुद घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरु केला.
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, सदरचा गुन्हा पानमंगरुळ येथील आरोपी यांनी त्याचे साथीदारा सोबत केला आहे. त्याप्रमाणे नमुद पथकाने अत्यंत कौशल्याने आरोपीची माहिती प्राप्त केली. प्राप्त माहितीचे सुयोग्य विश्लेषन करुन गुन्हयातील आरोपीस पानमंगरुळ येथून ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने त्याचे साथीदारसह अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गुन 478/2022 भादंवि क. 457,380 हा गुन्हा केल्याचे कबुली दिली. तसेच अक्कलकोट उविभागात त्याने सन 2021 व 2022 मध्ये खालील घरफोडया व चोरीचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. नमुद आरोपी यास दिनांक 16/04/2023 रोजी अटक करण्यात आली असून त्यास दिनांक 20/04/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर होती. सदर आरोपीत कडुन सदर गुन्हयातील व खालील गुन्हयातील असा एकुण 176 ग्रॅम वजनाचे सोने व 3302 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व पॅशन प्रो कंपनीची मोटार सायकल असे एकुण 5,34,019/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचा आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अरोपीत यांचेकडुन 13 गुन्हे उघड झाले.
तसेच नमुद आरोपी हा अक्कलकोट व सोलापूर उपविभागत प् आपल्या साथीदारा सोबत गंभीर 6 गुन्हे करून पाहिजे आरोपी मध्ये होता.
नमुद उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे यांचे पथकातील ग्रेडपोसई राजेश गायकवाड, सफी विराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, पोहवा सलीम बागवान, आबासाहेब मुंढे, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, पोना रवि माने, पोका समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, मपोकों/सुनंदा झळके, चापोको दिलीप चोरात, सायवर कडील पोना व्यंकटेश मोरे यांनी बजावली आहे.