कल्याण मध्ये एका बेवारस बॅगेमध्ये डीटोनेटर (स्फोटके) मिळून आल्याने एकच खळबळ…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कल्याण :- कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशनच्या जवळ एका बेवारस बॅगेमध्ये डिटोनेटर (स्फोटके) मिळून आल्याने एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळालं.

मिळालेल्या माहितीनुसार, विशेष शाखा कल्याण केंद्रांतर्गत कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १च्या बाहेरील बाजूस एक बेवारस बॅग मिळून आली.

सदर बॅगेची डॉग युनिट बीडीडीएस कडून तपासणी करण्यात आली असता त्या बेवारस बॅगमध्ये अंदाजे 54 डिटोनेटर (स्फोटके) मिळून आले आहेत.

दरम्यान या घटनेचा पोलीस तपास सुरू असून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंढरीनाथ कांदे यांनी गुन्हा दाखल होत असल्याचे सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट