चैनीसाठी मोटार सायकल चोरी करणाऱ्यास हिंजवडी पोलीसांनी १२ मोटार सायकलसह ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे : हिंजवडी पोलीस स्टेशन येथे दिनांक तक्रारदार नामे तानाजी मधुकर आमले वय ५२ वर्षे, धंदा नोकरी रा. आमलेवस्ती सांगवडे गाव, ता. मावळ, जि. पुणे. यांनी त्याची मोटार सायकल हि दिनांक २४/०१/२०२४ रोजी रोजी सकाळी ०७/३० वा ते दुपारी १५/०० या चे दरम्यान कोलतपाटील येथील गेटवर लावली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली आहे त्यावरुन हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुरजि. नं ८०/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत घडणारे वाहनचोरी गुन्ह्यांचे पार्श्वभूमीवर मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. हिंजवडी पोलीस ठाणे यांचे देखरेखीखाली हिंजवडी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी योग्य सुचना व मार्गदर्शन केले.
दाखल गुन्हयाचे घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदर फुटेजमधील संशयित इसम हा चोरी करण्यासाठी आलेल्या व चोरी करुन गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदरचा इसम हा पिपंळे सौदागर भागात राहत असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यावरुन त्या भागातील गोपणीय बातमीदारामार्फत माहीती घेतली असता पोलीस हवालदार ८७३ कॅमले यांना माहीती मिळाली की, सदरचा इसम हा वाकड ब्रिज येथे पांढऱ्या रंगाच्या गाडीवर थांबलेला आहे. त्यावरुन सदर ठिकाणी पोलीसांनी सापळा लावुन बातमीच्या वर्णनाचा इसम यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव पत्ता सुर्यकांत बळीराम आडे वय-२५ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. चंद्रकांत जगताप यांची खोली जगताप कॉलनी नं. २ बुध्दविहाराजवळ पिंपळे सौदागर पुणे मुळ गांव कोल्ही ता. वाशिम जि. वाशिम असे सांगितले त्याच्या ताब्यातील मोपेड गाडीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरची गाडी कोलतेपाटील मांरुजी येथुन चोरी केल्याचे सांगितल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याने चैनीसाठी हिंजवडी, देहुरोड, वाकड, तळेगाव दाभाडे, चिखली, हडपसर, इंदापुर भागातुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगुन त्या कादुन दिल्याने त्या पंचनाम्याने जप्त करुन त्याच्याकडून खालील मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ८०/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
२) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १०५/२०२५ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
3) हिंजवडी पोलीस ठाणे गू.र.नं.१६१/२०२१ भा.द. वि. कलम ३७९ प्रमाणे
४) हिंजवडी पोलीस ठाणे ग.र.नं.१०८/२०२४ भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे
५) देहुरोड पोलीस ठाणे गु.र.नं.१५८/२०२३भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे
६) देहूरोड पोलीस ठाणे गु.र.नं.२४८/२०२३ भा.द.चि. कलम ३७९ प्रमाणे
७) वाकड़ पोलीस ठाणे गु.र.नं.१२५१/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
८) तळेगाव पोलीस ठाणे गु.र.नं.८०/२०१२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे
९) चिखली पोलीस ठाणे गु.र.नं. ६०२/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
१०) हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं.१९१/२०१४भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे
११) इंदापुर पोलीस ठाणे पुणे ग्रा. गु.र.नं.१०/२०२४ भा.द.वि. कलम ३७१ प्रमाणे
१२) हिचे दाखल गुन्हयाधावत व मालकावाबत माहिती प्राप्त करत आहोत.
सदर आरोपीने चैनीसाठी चोरी केलेल्या एकुण १२ मोटार सायकल किमंत ३,६०,०००/- रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्या असुन एकुण ११ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. संजय शिंदे सो, पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, श्री, वसंत परदेशी सो, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परि. २. पिंपरी चिंचवड मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चि यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीराम पौळ, सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बापुसाहेब धुमाळ, नरेश बलसाने, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास कॅगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, मंगेश सराटे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com