खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत फुड मॉल पार्कीगमध्ये प्रवासी वाहनामधून सोने चोरणा-या आरोपीतांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अलिबाग – रायगड कडून पर्दाफाश…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

खोपोली : खोपोली पोलीस ठाणे कॉ. गुन्हा रजि. नं. ३८८ / २०२२, भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे हा गुन्हा दि.०७/१२/२०२२ रोजी दाखल आहे. नमुद दाखल गुन्हयामध्ये अज्ञात आरोपीत यांनी एकुण १,४४,००,०००/- रूपयाचे एकुण २.७३२ किलो ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट तसेच दागीने चोरी करून नेले होते. सदर गुन्हयाची तिव्रता पाहता सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे साहेब यांचे मार्गदर्शनानुसार श्री. दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्था. गु. अ. शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.

एक पथकामार्फत अशा प्रकारचे गुन्हे करणारे बाहेर रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच बाहेरील राज्यांतील आरोपीत यांचा शोध घेणे तसेच दुसरे पथकामार्फत घटनास्थळावरील सी. सी. टी. व्ही. फुटेजची पडताळणे करणे सुरू होते.
तपास पथकास घटनास्थळवरील सी. सी. टी. व्ही. कॅमे-यामध्ये संशईत आरोपीतांचे फोटो प्राप्त झाले. सदर संशईत आरोपीतांचे फोटोंच्या सहायाने तसेच गुप्तबातमीदारा मार्फत माहीती घेत असतांना पोलीस निरीक्षक श्री. दयानंद गावडे, स्था. गु. अ. शाखा रायगड अलिबाग यांना माहिती प्राप्त झाली की, अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपीत हे मध्य प्रदेश राज्यातील खैरवा, ता. मनावर, जि.धार येथील आहेत. सदर बातमीची खातरजमा करणेकरीता तात्काळ पोलीस निरीक्षक श्री. दयानंद गावडे, पोहवा / १८२० राजेश पाटील, यशवंत झेमसे व प्रतिक सावंत असे पथक मध्यप्रदेश राज्यामध्ये रवाना झाले.

सदर ठिकाणी जावून सीसीटीव्ही मधील प्राप्त फोटोच्या आधारे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी हा पप्पू बाबू खान मुलतानी, रा. खैरवा, ता. मनावर, जि.धार, राज्य मध्यप्रदेश हा असल्याची खात्री झाली. त्यामुळे तात्काळ सदर संशईत आरोपीत नामे पप्पू बाबू खान याचे घरी छापा टाकला असता सदरचा आरोपी हा त्याचे राहते घरी मिळून आला नाही. त्याचे घराची घरझडती घेतली असता झडतीमध्ये काहीएक मिळून आले नाही. त्यानंतर सदर आरोपीत याचा सख्खा भाउ ईस्माईल बाबू खान, वय २७ वर्षे, रा. खैरवा, ता. मनावर, जि.धार, राज्य मध्यप्रदेश याचेकडे आरोपीत नामे पप्पू बाबू खान व गुन्हयातील गेले मालाबाबत सखोल विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा त्याचा
भाउ पप्पू बाबू खान याने त्याचे साथीदारांसह केला असल्याचे सांगून आरोपीत नामे पप्पू बाबू खान याने त्याचेकडे ठेवण्यास दिलेली एकूण २.६८४ कि. ग्रॅम वजनाची १,४२,२५,९४२/- रूपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे व दागिने असा मुद्देमाल समक्ष हजर केला. सदरचा मुद्देमाल दोन पंचांसमक्ष पंचनाम्याव्दारे जप्त करण्यात आला आहे.

पाहीजे आरोपीत याचे नाव व पत्ता :-
पप्पू बाबू खान मुलतानी, रा. खैरवा, ता. मनावर, जि.धार, राज्य मध्यप्रदेश व त्याचे साथीदार

सदर गुन्हयामधील चोरीस गेलेले २.६८४ किलो ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट तसेच दागीने असा एकुण १,४२,२५,९४२/- रू. किंमतीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो. हवा. १८२० राजेश पाटील हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे साहेब यांचे मार्गदर्शनानुसार श्री. दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्था.गु. अ. शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि नागेश कदम, सहा. फौजदार दिपक मोरे, देवराम कोरम, पोहवा / राजेश पाटील, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, पो.शि. ईश्वर लांबोटे यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट