माणगांव साई येथे झालेल्या चोरीचा खुलासा माणगांव पोलिसाच्या हाती , रॉबरीचा बनाव माणगांव पोलिसांकडून उघड…

0
Spread the love

प्रतिनिधी-सचिन पवार

माणगांव: माणगांव पोलीस स्टेशनं येथे प्रथम प्रभाकर पारावे वय वर्ष 21 रा. चिंचवळीवाडी पो. गोरेगाव ता. माणगांव हा यशगौरव कोपोरेशन तळेगाव ता. माणगांव याचे राईस मिळाचे पैसे कलेक्शन करण्याकरिता म्हसळा येथील व्यापारी दुकानदार याचेकडे गेला असता त्यास दि.३१ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वा. सुमारास मोर्बा घाटामध्ये त्याच्या ताब्यातील ऍक्टिवा स्कुटीवरून माणगांव बाजूकडे येत असताना त्याच्या पाठीमागून अचानक एक पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार नंबर नसलेली त्याच्यात अनोळखी तीन इसम उतरून त्याच्या जवळ असलेली लाल व निळ्या रंगाची बॅग व त्यामध्ये असलेले ५,५७,३३९ रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन पोबारा केला अशी तक्रार प्रथम पारावे यांनी माणगांव पोलीस ठाण्यात केली होती.

सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने माणगांव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास केला होता सदर गुन्हा घडल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करीत असताना पोलिसांनी सदर फिर्यादी प्रथम पारावे याचे बाबत संशय निर्माण झाला होता त्यामुळे त्यास विश्वासात घेऊन तपास केला असता सदर फिर्यादी प्रथम पारावे यांनी त्याच्या लाळसेपोटी व गाडी खरेदी करण्याची असल्याने सदर गुन्ह्याचा बनाव केलेबाबत सांगितले सदर गुन्ह्याने चोरीला गेलेली रक्कम ५,५७,३३९ रुपये सदर फिर्यादी प्रथम प्रभाकर पारावे याचेकडून हस्तगत करण्यात आला असून सदर कार्यवाही माणगांव पोलीस करीत आहेत.

सदर या घटनेची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,सॊ. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, सॊ.श्री. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सूर्यवंशी, सॊ. श्री. माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि सतीश आस्वर, नितीन मोहिते, नवनाथ लहागे, पो. उपनिरीक्षक अस्मिता पाटील, विक्रांत फडतरे, कीर्तीकुमार गायकवाड, स. फौं. किशोर कुवेस्कर, पो. हवालदार किरण तुणतुने, मिलिंद खिरीट, पो.शि. रामनाथ डोईफोडे, श्यामसुदंर शिंदे, संतोष सगरे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट