ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला..

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :-रविवार 10/03/2024 रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सांगवी ता. फलटण, जिल्हा_सातारा गावात रात्री 1 वाजता गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री विनोद मोरे यांच्या घरी 5-6 चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत ,हे लक्षात येताच गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री सुहास मोरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली. त्यामुळे तात्काळ गावकरी तसेच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची नाईट राउंडची गाडी घटनास्थळी दाखल झाले.
संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com