ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला
उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– मंगळवार 27/02/2024 रोजी औंध पोलीस स्टेशन हद्दीतील गोसाव्याचीवाडी ता. खटाव, जिल्हा_सातारा गावात रात्री 2 वाजता गावातील श्री नानासाहेब कदम यांच्या घरी 2-3 चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत,हे लक्षात येताच गावचे उपसरपंच श्री कालिदास फडतरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली.
त्यामुळे तात्काळ गावकरी तसेच औंध पोलीस स्टेशनची नाईट राऊंडची गाडी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com