ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :– शुक्रवार 12/01/2024 रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमंतवाडी ता. फलटण, जिल्हा_ सातारा गावात रात्री 1 वाजता गावात चोरीच्या उद्देशाने 3 चोर आलेले आहेत आणि गावातील श्री लालासाहेब पवार यांच्या घराचे लॉक तोडून पाच हजार रुपये कॅश चोरून गावातील वडाचीवाडी येथील श्री अंकुश भोसले यांच्या शेजारील घरांच्या कड्या लावून घराचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत आहेत,हे लक्षात येताच गावातील पोलीस पाटील श्री जगदीश गाडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला ही माहिती कळवली.

त्यामुळे तात्काळ गावकरी घटनास्थळी दाखल झाले.चोरांचा पाठलागही केला परंतु; संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट