साताऱ्यात पाण्याची मोटार बंद कारणावरुन डोक्यात लाकडी दांडके घालून मरणास कारणीभूत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा …

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :- दिनांक 19.02.2021 रोजी 20.30 वा. मौजे नारायणवाडी ता. कराड गावचे हद्दीतील पाचवड फाटा येथील राजस्थानी स्विट होम समोर यातील आरोपी रामप्रसाद ऊर्फ रामु परमेश्वर गोस्वामी वय 41 रा रामप्रसाद खेडा, ता नटखेडा, जि लखनऊ राज्य उत्तर प्रदेश याने रवी अशोक यादव वय 32 रा पाचवड फाटा ता कराड मुळ रा उत्तर प्रदेश पाण्याची मोटर बंद करणेचे कारणावरून चिडून जावून बर्फ फोडणेचे लाकडी दांडके मयताचे डोकीत मारून त्याचा खून केला वगैरे मजकुरची खबर दिलेने कराड तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 102/2021 भादस कलम 302 प्रमाणे गुन्हा रजि.दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब भरणे व पोहवा / 262 डी.एम. कोळी कराड तालुका पोलीस ठाणे यांनी केला आहे.
नमूद गुन्हयाचे मा. सत्र न्यायाधीश श्री आण्णासाहेब पाटील सो यांचे न्यायालयात सुनावणी होवून सुनावणी दरम्यान केले तपासातील पंच साक्षीदार व वैद्यकीय पुरावे यांचेबाबबत सहा. सरकारी अभियोक्ता एम व्ही कुलकर्णी सो यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपी रामप्रसाद ऊर्फ रामु परमेश्वर गोस्वामी रा रामप्रसाद बेटा, ता नटखेडा, जि लखनऊ राज्य उत्तर प्रदेश यास आरोपीस भा. द. वी. कलम 302 नुसार दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व 1000/- रू द्रव्यदंड, दंड न भरल्यास सहा महिना सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्हयाचे तपास व शावीतीचे अनुषंगाने मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक सो सातारा. मा. श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सो सातारा यांचे मार्गदर्शनाप्रमाणे व मा. अमोल ठाकूर, उपविभागीय पोलीस अधीकारी सो कराड विभाग कराड यांचे सुचने प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री विजय पाटील कराड तालुका पोलीस ठाणे यांनी शाबीतीसाठी पाठपूरवा केला असून सदर गुन्हयात सरकारी पक्षाचे वतीने युक्तीवाद सहा. सरकारी वकील कराड, कोर्ट पैरवी सफौ मदने, मपोकों/1120 श्रीमती अर्चना पाटील यांनी सादर केला असून सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरून सदर बाबत मा. न्यायालयाने वरील
प्रमाणे शिक्षा सुनावली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com