केशोरी पोलीस स्टेशनच्या “गांव तेथे ग्रंथालय “या उपक्रमांतर्गत गोठणगांव व वडेगाव बंधा येथील स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन..

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली
केशोरी पोलीस स्टेशनच्या “गाव तेथे ग्रंथालय” या उपक्रमांतर्गत _”गोठणगाव” व “वडेगाव बंद्या” येथील स्पर्धा परीक्षा वाचनालयांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.



याबाबत थोडक्यात असे की, प्रत्येक गावात स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करावे, गावा- गावातून अधिकारी निर्माण व्हावे, तरुण-तरुणींना शासकीय नोकरी अभ्यासाकरिता एक व्यासपीठ निर्माण व्हावे या संकल्पनेतून केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम यांनी "गाव तेथे ग्रंथालय" हा नविन उपक्रम सुरू करून केशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावांमध्ये नविन स्पर्धा परिक्षा वाचनालय उघडण्याचे ठरविले....
या संकल्पनेनुसार दि.०३/०१/२०२४ रोजी गोठणगाव व वडेगाव बंद्या येथे मा.अपर पोलीस अधिक्षक गोदिया श्री. नित्यानंद झा, साहेब यांच्या हस्ते नविन स्पर्धा परिक्षा वाचनालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला....

सदर उद्घाटन सोहळयाला विशेष अतिथी म्हणून श्री. अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार अर्जुनी मोर, श्री. सुहास खरे, अध्यक्ष माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूर व त्यांचे सर्व सदस्य, श्री. संजय ईश्वार, सरपंच गोठणगाव, श्री. घनश्याम शहारे, सरपंच वडेगाव बंध्या, सपोनि सचिन घाटे, सपोनी आनंदराव घाडगे, देवरी, पोउपनि प्रताप बाजड, माऊली मित्र मंडळ नागपूरचे सर्व पदाधिकारी, गावातील मान्यवर मंडळी, स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, मुले मुली, गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थीत होते…




या दोन्ही वाचनालयांच्या निर्मिती साठी पोलीस स्टेशन केशोरीचे सर्व अधिकारी/अंमलदार, गोठणगाव व वडेगाव बंद्या ग्रामपंचायत पदाधिकारी/कर्मचारी, माऊली सेवा मित्र मंडळ नागपूरचे सर्व सदस्य यांनी खूप परिश्रम घेतले...
या दोन्ही स्पर्धा परिक्षा वाचनालयांची निर्मिती मा. श्री.निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि सोमनाथ कदम, पोउपनि प्रताप बाजड पोहवा. शिवदास निकोडे , प्रेमदास होळी, विलास राऊत, प्रल्हाद देव्हारे, सुशिल रामटेके, राहुल चिचमलकर, नितीन डुंभरे, रामेश्वर मेश्राम, मपोहवा हरिणखेडे व सर्व अंमलदार यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com