49 वी कोल्हापूर परीक्षेत्रिय क्रीडा स्पर्धा 2023 दरम्यान सांगता समारोप अति उत्साहात संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
सोलापूर:-या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी व जबाबदारी पोलीस उपायुक्त मा. श्री विजय कबाडे सर आणि सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजन माने सर यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्री. रोहीत चौधरी यांना दिली.


सहनिवेदिका श्वेता हुल्ले मॅडम यांच्या सुमधुर आवाजाने आणि भारदस्त निवेदनाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.




त्या वेळी सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय आदरणीय श्री सलमान आझमी सर , कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय श्री सुनील फुलारी सर, महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख पोलीस आयुक्त आदरणीय डॉ. राजेंद्र माने सर, सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली सर, पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सर, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेन्द्र पंडित सर, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर, पोलीस उपायुक्त श्री अजित बोराडे सर, पोलीस उपायुक्त आदरणीय श्री विजय कबाडे सर, सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम पार पडला.



यावेळी ची जनरल चॅम्पियनशिप सातारा पोलीस दलाने पटकावली. बेस्ट ॲथलिट पुरुष म्हणून अमृत तिवले कोल्हापूर यांना होंडा शाइन गाडी गिफ्ट देऊन गौरवण्यात आले.बेस्ट ॲथलिट महीला सोनाली देसाई कोल्हापूर यांना होंडा ॲक्टिवा गाडी गिफ्ट देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ठ मार्च पास सांगली जिल्हा पोलिस दल तर उत्कृष्ठ शिस्तबद्ध संघ सोलापूर शहर पोलीस दलास गौरवण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com