१७ दिवसापूर्वी निर्घृण खून करुन पसार झालेल्या अज्ञात आरोपीस ताब्यात घेवून अनडिटेक्ट खुनाचा गुन्हा अघड..

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– दि.१६/०२/२०२४ रोजी सकाळी ०१.०० वा.ते दुपारी १२.०० वा.च्या सुमारास पिपोंडे बदूक ता. कोरेगाव जि.सातारा गावचे हद्दीत सुतारकी नावचे शिवारातील शेतात मयत भगवान मच्छिद्र सपकाळ रा. पिपोंडे बटुक ता.कोरेगाव जि.सातारा हा ज्वारी काढण्यास गेला असता त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात व कपाळावर लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याचा निर्धन खून केला म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरुन बाठार पोलीस ठाणे गु.र.नं.३८/२०१४ भादविक ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
नमूद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव उपविभाग कोरेगाव व पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली. श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपी बाबत माहिती काढून त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर व वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांना दिल्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांचे अधिपत्याखाली स्वतंत्र तपास पथके तयार करुन त्यांना नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या.
तपास पथकांनी सर्वप्रथम पटनास्थळाची पाहणी केली, पटनास्थळ हे डोंगरभागात रानावनात असल्याने घटनास्थळावर व आजूबाजूचे परिसरामध्ये कोणीही सदरची पटना पाहणारे अगर मयतास त्या ठिकाणी जाताना पाहणारे साक्षीदार मिळून आले नाहीत, तसेच त्याचाचत तांत्रिक विश्लेषनाद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतू काही एक माहिती मिळून न आल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. त्यानंतर देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग अहोरात्र १० दिवस वेषांतर करुन सदर परिसरामध्ये गुप्त वॉच ठेवून एक साक्षीदार मिळविला. त्या साक्षीदाराने मयत इसमास तसेच पिंपोडे गावातील एका इसमास घटनास्थळाकडे जाताना पाहिले असल्याचे सांगीतल्याने तपास पथकाने प्राप्त माहितीतील इसमाचा शोध घेतला परंतू तो इसम हा गावात नसल्याचे आढळून आले.
दि.०२/०३/२०१४ रोजी नमुद इसम हा सातारा शहरातील पिलेश्वरी नगर परिसरात असल्याचाचतथी गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्यांनी “पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, अमृत करें, शिवाजी भिसे, स्वप्नील दाँड, दलजित जगदाळे, विजय निकम यांचे तपास पथकास नमुद इसमास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे पथकाने सातारा शहरातील पिलेश्वरी नगर परिसरामध्ये प्राप्त माहितीतील इसमाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्या इसमाकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतल्याने १७ दिवसापूर्वी झालेला खुनाचा गुन्हा कोणताही पुरावा, तसेच धागेदोरे नसताना उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश प्राप्त झाले आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहावक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश पाडगे, संजय शिर्के, विजय कांचळे, संतोष सपकाळ, शरद बेचले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, लेलेश फडतरे, सचिन साकूंखे, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, हसन तडवी, सनी आवटे, अजय जाधव, अमित झेंडे, प्रविण कांवळे, अमित माने, मनोज जापप, शिवाजी भिसे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चक्षाण, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, विशाल पवार, केतन शिंदे, धीरज महाडीक, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, स्वप्नील दौड, वैभव सावंत, मोहसिन मोमीन, दिपाली बादव, शुभांगी पवार, पंकज बेसके, शिवाजी गुरव, अमत करें, दलजित जगदाळे, विजय निकम, संभाजी साळुंखे, पुसेगाव पोलीस ठाण्याचे अशिष कांचळे, वातार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले पोलीस अंमलदार इम्रान मुलाणी, प्रकाश चव्हाण, गणेश इथापे, प्रतिक देशमुख, प्रशांत गोरे, नितीन पवार, सहदेव तुपे यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com