एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या दोघांच्या पेल्हार पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर :– हातचलाखी करुन ए.टी.एम बदली करून फसवणूक करणाऱ्या २ सराईत आरोपीतांना अटक करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले आहे.


२१ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास रमाकांत अभयकुमार मोहंन्ती (वय २२) पालघर येथील इंडसइंड बैंकच्या ए.टी.एम मधून पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या पाठीमागील अनोळखी इसमाने फिर्यादी यांना पैसे काढण्यास मदत करतो असे सांगुन फिर्यादी यांचे ए.टी.एम कार्ड हातचालाखीने बदलून फिर्यादीस त्यांचे कडील दुसरे बँकेचे ए.टी.एम कार्ड देऊन फिर्यादीच्या बँक खात्यातून त्यांचे परस्पर ५५ हजार ४५० रुपये काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाणे गु.र.क्र. ७१२/२०२४ बीएनएस ३१८ (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदारांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. सदर आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवू न सदर ए.टी.एम व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासुन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनोळखी आरोपीत याचा पाठलाग केला. सदर सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपीत हे एका चेंगनार या चारचाकी वाहनातून गुन्हा करण्याकरीता आल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने सदर वॅगनार कारचा घटनास्थळ ते कळंबोली नवी मुंबई असा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाठलाग केला असता सदर कार ही आरोपीत यांनी झुाम या अॅप वरुन बुक केली असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. पोलीस पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी महेश पांडुरंग धनगर वय-३७ वर्ष रा.कल्याण जि. ठाणे), जितेश रामपाल जाटप उर्फ डब्बू ( वय २९ वर्षे, रा. उल्हासनगर जि. ठाणे) यांना ताब्यात घेतले. आरोपीकडे तपास करता त्यांनी व त्यांचे आणखी दोन साथीदार यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीत यांनी अशाच प्रकारचे मुंबई सीएसटी, भिवंडी बायपास, मानखुर्द, भिवंडी काल्हेर रोड येथे गुन्हे केले असल्याबाबत तपासात सांगितले आहे. सदर आरोपीत हे सराईत असून आरोपी महेश पांडुरंग धनगर, याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाणे गु.र.क्र. १६५/२०२१ भादविस कलम ४२०, ३७९, ३४ प्रमाणे, राहुरी पोलीस ठाणे गु.र.क्र. २१४/२०२१ भादविस कलम ४२०,४३९ सह आयटी अॅक्ट ६६(क), ६६(ई) प्रमाणे. खोपोली पोलीस ठाणे गु.र.क्र. २००/२०२० भादविस कलम ४२०, ३४ प्रमाणे, खेड पोलीस ठाणे गु.र.क्र. २६३/२०१७ भादविस कलम ४२० प्रमाणे, सासवड पोलीस ठाणे ग्.र.क्र. १२०/२०२१ भादविस ४२०, ३४ प्रमाणे, बारामती तालुका पोलीस ठाणे गु.र.क्र. ३३०/२०१८ भादविस कलम ४२० प्रमाणे, ७) शिक्रापुर पोलीस ठाणे गु.र.क्र. २५०/२०१५ भादविस कलम ४२०,४३९,३४ प्रमाणे, शिक्रापुर पोलीस ठाणे गु.र.क्र. २४६/२०१६ भादविस कलम ४२०,३४, १२० (ब) प्रमाणे, रत्नागिरी पोलीस ठाणे गु.र.क्र. १६६/२०२० भादविस कलम ४२० प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी जितेश रामपाल जाटप उर्फ उच्चु (वय-२९) यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाणे गु.र.क्र.४६९/२०१६ भादविस कलम ४२०,३३६.३३८,४२७ प्रमाणे, अंबरनाथ पोलीस ठाणे गु.र.क्र.१२५७/२०१८ ३०२,४५२,३४१,७५.१४३.१४७,१४८.१४९ प्रमाणे भादविस कलम, उल्हासनगर पोलीस ठाणे गु.र.क्र.१८७/२०१७ भादविस कलम ३५४ (ड), ५०४, पोस्को १२ प्रमाणे गुन्हे नोंद आहेत.’


.सदर गुन्ह्याचा तपास मधुकर पांडेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रेय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनिरी/तुकाराम भोपळे, पोहवा/योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, वाल्मीक पाटील, मिथुन मोहिते, पो.अं. रवि वानखेडे, किरण आव्हाड, निखील मंडलिक, राहुल कर्षे, दिलदार शेख, अभिजित नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सर्व नेम. पेल्हार पोलीस ठाणे पोहवा/नामदेव ढोणे, पो.अं. सोहेल शेख नेम. पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंडळ ३ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट