मुंबई येथे दाखल दरोडयाचे गुन्हयात दोन वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीतास अग्निशस्त्रासह युनिट ६ पथकाने केले जेरबंद..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने मा. वरिष्ठांचे आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई तसेच बेकायदेशीर हत्यार, अग्निशस्त्र वापरणारे यांचेविरोधात कडक कारवाईचे आदेश झाले असताना आज रोजी सदर आदेशाचे अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट ६ येथील पो. हवा. बाळासाहेब सकटे, पो.ना. कानिफनाथ कारखेले यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, एक इसम हा स्वतः चे कब्जात बेकायदेशीरीत्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगत आहे. सदर प्राप्त बातमीची शहानिषा करणेकामी गुन्हे शाखा, युनिट ६. प्रभारी पो.नि. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक यांनी आरोपी नामे साहिल राजु शेख, वय २४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा.३८ मॅजेस्टिक पार्क, बी बिल्डिंग, फ्लॅट नं. १२०६, वडाची वाडी रोड, उंड्री, पुणे यास कॅफे बन मस्का, कौसरबाग, कोंढवा खुर्द, पुणे येथुन ताब्यात घेतले.

नमुद इसमास विश्वासात घेवुन सखोल चौकशी करून त्याचे ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सदरबाबत काळेपडळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं.१२४३/२०२४, आर्म अॅक्ट कलम ३.२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे करीत आहेत.

सदर आरोपी हा व्ही.पी. रोड पोलीस ठाणे, मुंबई गु.र.नं.२९७/२०२२, कलम ३९४, ३९५, ३९७, ५०६(२), १२० (ब) भा.द.वि. प्रमाणे दाखल गुन्हयात दोन वर्षापासुन फरार आहे.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट ६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हया. रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, पो.ना. नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पो.अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, पो.हवा. सुहास तांबेकर, मपोअं प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट