मंदिरातील टिव्ही, दानपेटी, घंटी चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक, गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा पथकाची उल्लेखनीय कामगिरी…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया:
याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, घटना दिनांक - 16/09/2023 रोजीचे 14.00 वाजता ते 19/09/2023 चे 06.00 वाजता चे सुमारास तक्रारदार- श्री. हंसराज मिताराम चौरे वय 52 वर्षे, धंदा शिक्षक रा- चुलोद बाहेरगावी गेले होते, दरम्यान कोणितरी अज्ञात चोरट्यानी सूनामौका पाहून त्यांचे राहते घराचे समोरील दाराचे कडीकोंडा तोडून घरातील सॅमसंग कंपनीची एलईडी टीव्ही किमती 16,200/- रुपयाची चोरी केल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणें गोंदिया ग्रामीण येथे अप. क्रमांक- 372/2023 कलम 454, 457, 380 भादवि अन्वये तसेच चुलोद येथील मंदिरातील दानपेटी व लागलेली घंटी अज्ञात चोरट्यानी चोरी केल्याचे फिर्यादी श्री. मंसाराम ठाकरे, मंदीर पुजारी, राहणार- चुलोद यांचे तक्रारीवरून अप. क्र. 373/2023 कलम 454, 457, 380 भा.द.वि प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.
मा. पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्ह्यांत अटक कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत निर्देश सूचना दिल्या होत्या.
या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे, मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थनिक गुन्हे शाखा पथक जिल्ह्यातील गुन्हेगारांचा शोध करीत होते. नमूद गुन्ह्यातील अरोपितांचा शोध करीत असताना
गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या खात्रीलायक माहीतीच्या आधारे — संशयित आरोपीत इसम नामे–
1) आनंद सुखदेव रहांगडाले वय 22 वर्षे राहणार चुलोद, गोंदिया यास ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस नमूद दोन्हीं चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदरचे गुन्हे त्याचा साथीदार फरार आरोपी नामे - साहील कैलास राऊत, राहणार चुलोद, गोंदिया याचेसोबत मिळून केल्याची कबुली दिली.
वरील नमूद आरोपीचे ताब्यातून त्याचे राहते घरून चोरीची सॅमसंग कंपनीची एलईडी टिव्ही, डिटिएच सेटअप बाक्स, केबल वायर, व भंगाराम बाबा मंदीरातील चोरी केलेली दानपेटी व घंटी , नगदी, आणि गुन्ह्यात वापरलेली मो.सा. *असा एकूण 66 हजार 900 रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्यात हस्तगत करून जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपीस पो. ठाणे गोंदिया ग्रामीण पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पुढील कायदेशीर कारवाई व तपास पो.ठाणे गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात म.पो.उप.नी. वनिता सायकर, पोउपनि महेश विघ्ने, सहा. फौ.अर्जुन कावळे, मधुकर कृपाण, पो.हवा. राजू मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख,पो.शि. अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, चा.पो.शि. कुंभलवार यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com