ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– शुक्रवार 05/01/2024 रोजी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील दानवलेवाडी ता.माण, जिल्हा_सातारा गावात रात्री 12 वाजता गावातील साळुंखे मळ्यातील श्री सोपान माने यांच्या घरी 2-3 चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत.आणि घरावर दगडफेक करत आहेत,याची माहिती मिळताच,गावातील श्री संकेत माने यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला ही माहिती कळवली. त्यामुळे तात्काळ गावकरी घटनास्थळी दाखल झाले.
संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com