ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

फलटण:-रविवार 31/12/2023 रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील अद्रकी बुद्रुक ता.फलटण, जिल्हा_सातारा गावात रात्री 11 वाजता रामोशी आळी येथे 3-4 चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत.याची माहिती मिळताच,गावातील पोलीस पाटील श्री दीपक भिंगारे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला व लोणंद पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली.

त्यामुळे तात्काळ गावकरी तसेच लोणंद पोलीस स्टेशनची नाईट राउंडची गाडी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट