मा.पोलीस निरीक्षक श्री. सतीश शिंदे यांच्या टीमने सांगली जिल्हयात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशंसापत्रकाने सन्मानित…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :- कर्नाटक राज्यात पार पडलेल्या 2023-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली सर, मा. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील सर यांचे मार्गदर्शनाखाली व मा. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सर यांचे नेतृत्त्वाखाली विशेष मोहीम दरम्यान त्यांच्या टिमने सांगली जिल्ह्यात कारवाई करून 07 देशी पिस्तूल, 16 जिवंत काडतुसे, 228 नशेच्या गोळ्या, 1200 ग्रॅम तयार गांजा असा 9,67,000/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता.

सदर कामगिरीसाठी मा. पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली सर यांनी 19/07/2023 रोजी मा.पोलीस निरीक्षक श्री. सतीश शिंदे व त्यांच्या टीमला प्रशंसापत्र पत्र देऊन गौरविले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट