पत्रकारांवर पिस्तुलातून गोळी झाडुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :- स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं १४२/ २०२३ भा.दं.वि. कलम ३०७, ३४१, ५०६ (२), ३४ व आर्म अॅक्ट कलम ४ (२५) ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम २०१७ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी हे पत्रकार असुन त्यांचेवर दि. २७/०५/२०१३ रोजी रात्री १९/०० वा. चे सुमारास फिर्यादी है त्यांचे दुचाकीवरून घरी जात असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या ०५ अज्ञात आरोपींनी त्यांचे दुचाकीला गाडी आडवी लावुन त्यांचे अंगावर मिरची पावडर फेकुन कोयता घेवुन त्यांचे अंगावर धावुन गेले असता फिर्यादी हे सदर ठिकाणाहुन त्यांचा जीव वाचवून पळुन गेले त्यानंतर दि. ११/०६/२०२३ रोजी रात्रौ २१/०० वा. चे सुमारास फिर्यादी हे त्यांचे राहाते घराजवळ आले असता परत सदर दोन मोपेड वरील ०५ अज्ञात आरोपी यांनी फिर्यादी यांचा पाठलाग करुन त्यांचेकडील पिस्तुलमधुन एक राउंड फायर केला असता फिर्यादी गाडीवरच खाली वाकल्याने ते त्यातुन वाचले व तेथुन ते सोसायटीचे आतमध्ये गाडी घेवुन गेले व त्यांचेवर झालेला प्राणघातक व जिवघेणा हल्ला झाल्याने फिर्यादी यांनी वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपी हे तोंडाला रुमाल व मास्क तसेच डोक्यावर टोपी परिधान करुन रात्रीच्या वेळी हल्ला करीत असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसुन आले परंतु त्यांची ओळख व गाडयांचे नंबर ओळखणे अतिशय जिकरीचे व अवघड झाले होते. सदर आरोपी हे इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपचे कॉलींगद्वारे एकमेकांचे संपर्कात असल्याने त्याबाबत तात्रीक विश्लेषनामध्ये अडचन येत होती. स्वारगेट तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी जवळ जवळ १०० ते १२० सीसीटिव्ही फुटेज चेक केले परंतु काहीएक उपयुक्त माहिती मिळुन आली नाही. स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सलग १५ दिवस अहोरात्र चिकाटीने आरोपीचा शोध घेतला असता पो. अं. ९८२० अनिस शेख, पो. अं.१००१६ शिवदत्त गायकवाड, पो. अं. १०१४७ संदीप घुले, पो.अं. १००६२ फिरोज शेख व पो. अं ८२३९ सोमनाथ कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि दाखल गुन्हयातील संशयित आरोपी रांजणगाव येथे जात आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीबाबत मा. वरिष्ठांना माहिती दिली असता त्यांनी लागलीच सापळा रचुन कारवाई करणेबाबत आदेशित केले त्यानंतर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांचे पथक व पोलीस उप निरीक्षक अशोक येवले यांचे पथक असे दोन पथके तयार करुन सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांचे पथक रांजणगावकडे रवाना केले तसेच पो. उप निरी येवले यांचे पथक धायरी भागात थांबुन होते. तरी सदर संशयित आरोपी हे पेरणेफाटा लोणीकंद याठिकाणी थांबले आहेत अशी बातमी मिळाल्याने आम्ही लागलीच सदर बातमीचे ठिकाणी जावुन सापळा थांबलो असता सदर ठिकाणी आकाशी रंगाचा हाफ बाहयाचा टि शर्ट व काळया रंगाचा फुल बाहयाचा टि शर्ट घातलेले दोन इसम सदर ठिकाणी संशयीत रित्या फिरत असल्याचे दिसुन आले तसेच आमची चाहुल लागताच ते जोरात पळुन जात असताना आम्ही लागलीच वरील स्टाफच्या मदतीने त्यांचा शिताफीने पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे १) प्रथमेश ऊर्फ शंभु धनंजय तोंडे वय २० वर्षे धंदा रोजंदारी रा. राजेंद्रनगर पी.एम.सी. कॉलनी सी बील्डींग फ्लॅट नं. ११४ दत्तवाडी पुणे २) अभिषेक शिवाजी रोकडे वय २२ वर्षे धंदा बेरोजगार रा. नांदेड गाव जाधवरांच्या वाडयाशेजारी तीसरा मजला असे असल्याचे सांगीतले तसेच सदर आरोपींकडे वर नमुद दाखल गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्हा त्यांचे इतर साथीदारांसह मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यांचे इतर साथीदारांचा तपास पथकाचे अधिकारी सपोनि प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पो. हवा. तारु पो. अं. दिपक दाड, सुजय पवार, प्रविण गोडसे वरमेश चव्हाण असे मिळुन धायरी, नांदेडगांव या परिसरामध्ये पहाटेचे सुमारास सापळा लावुन ०४ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता ते विधीसंघर्षीत असुन त्यांचा दाखल गुन्हयामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन तपासादरम्यान ०१ गावठी पिस्टल, ०१ जिवंत काडतुस ०३ कोयते, गुन्हयात वापरलेल्या ०४ दुचाकी गाडया व ०३ मोबाईल फोन असा एकुण २ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून सुपारी घेवुन घडला असल्याचे प्रथमदर्शनी तपासावरुन निष्पन्न झाले आहे. तरी सदर गुन्हयातील आरोपी हे अभिलेखावरील आरोपी असुन ते सराईत व घातक हत्यारानीशी वावरत असल्याने त्यांना पकडणे धोकादायक होते तरी वरील स्टाफच्या मदतीने अतिशय सावधगीरीने व शिताफीने त्यांना जेलबंद करण्यात स्वारगेट तपास पथकाला यश आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. रितेश कुमार सो, पोलीस आयुक्त पुणे शहर मा. श्री. संदीप कर्णिक सो. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर. मा. स्मार्तना पाटील सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२. पुणे शहर. मा. श्री. नारायण शिरगावकर सो. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक इंदलकर व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, व पोहवा मुकुंद तारु, पोशि सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, दिपक खेदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट