भर रस्त्यात डिलिव्हरी झालेल्या महिलेला तात्काळ हाॅसपिटल भरती करणाऱ्या रिक्षा चालकाचा कल्याण वाहतूक पोलीसांकडून विशेष सत्कार…

0
WhatsApp Image 2023-10-02 at 5.43.23 PM
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कल्याण:- दिनांक ०२/१०/२०२३ रोजी शहर वाहतूक उपविभाग कोळशेवाडी हद्दीत सहा ते सात दिवसापूर्वी कल्याण पूर्व रेल्वे स्टेशन स्कायवॉक वरून एक गरोदर महिला रुक्मिणी बाई हॉस्पिटल कल्याण पूर्व येथे जात असतांना सदर महिलेने स्काय वॉक वरतीच नवजात बाळाला जन्म दिला.

अशा प्रसंगी प्रसंगावधान दाखवून रिक्षा चालक संजय जगताप व त्यांचे इतर रिक्षा चालक सहकारी यांनी सदर महिलेस व बाळाला सुखरूप खाजगी रुग्णवाहिनीतून हॉस्पिटल येथे भरती केले.

 रिक्षा चालकांच्या या सेवाभावी प्रवृत्तीचे कल्याण वाहतूक विभाग स.पो.आ. श्री  मंदार धर्माधिकारी, कोळशेवाडी वाहतूक उपविभागाचे प्रभारी व.पो.नि श्री. रवींद्र क्षीरसागर त्या सोबत पोलीस उपनिरीक्षक धनंजय वाघ  या सर्व अधिकारीनी कोळसेवाडी वाहतूक उप विभाग कार्यालय, चक्कीनाका येथे पुष्पगुच्छ, श्रीफळ, शॉल देऊन कौतुक व अभिनंदन  केले व यापुढेही असेच चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट