वृध्द दांपत्यास तात्काळ गहाळ साहित्य बॅग मिळवुन देण्यात गोंदिया दामिनी आणि भरोसा सेलची उल्लेखनीय कामगिरी…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-🔅 पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्ह्यात महिला, लहान मुले -मुली, बालके, शाळकरी विद्यार्थी , युवक- युवती यांचे सुरक्षितता, महीला व बालके यांच्यावर होणारा अत्याचार रोखण्यासाठी दामिनी पथक व भरोसा सेल कार्य करीत आहे…. …. आणि यांकरिता दामिनी पथकाद्वारे जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, रेल्वे, बस स्थानके परिसरात गस्तीद्वारें निगराणी करण्यात येत आहे…. आणि महीला, लहान बालके , मुले – मुली यांचे सुरक्षितते करीता मदत पुरविली जात आहे….

याचाच एक भाग म्हणून पोलीस निरीक्षक योगीता चाफले, भरोसा सेल तथा प्रभारी अधिकारी दामीनी पथक यांचे नेतृत्वात आज दिनांक 30-11-2023 रोजी दामिनी पथक पो. नि. चाफले, यांचे मार्गदर्शनात मपोउपनि नेहे सह पोशि बावनकर, मपोशि मंजुटे, चामपोशी पाचे असे संयुक्तपणे दैनंदिन प्रमाणे मरारटोली बसस्टॉप येथे पेट्रोलिंग करीत असताना गस्ती दरम्यान बसस्थानकावर एक वयोवृध्द दाम्पत्य रडत असतांना दिसुन आले…. यावरुन सदर दांम्पत्याला विचारपुस केली असता, ते दांम्पत्य हे गोंदिया ते नागपूर येथे जाणा-या शिवशाही बसमध्ये बसले परंतु त्या बसची टिकीट ‘ही जास्त असल्याने ते दांम्पत्य बस मधुन लगबगीने खाली उतरले. परंतु त्याची निळ्या रंगाची बॅग ज्यामध्ये त्यांचे दागिने व काही रोख रक्कम ठेवलेले होते…….ती बॅग गाडीमध्येच विसरले असल्याचे त्यांच्या कडून समजले, नागपूर कडे जाणारी शिवशाही एस. टी. बस ही गोंदिया बस स्टॉप येथून नागपूर कडे निघुन गेलेली होती. तेव्हा पथकाने गोंदिया बस डेपो येथे बसची चौकशी करून असता सदर एस.टी. बसचे नंबर प्राप्त करून बसच्या मागे मागे शासकिय वाहनाने जावून शिवशाही बसला गोरेगाव येथे थांबवून बसमध्ये त्यांच्या बॅगची सहानिशा केली असता सदर बसमधे वृध्द दाम्पत्याची बॅग मिळुन आल्याने सदर बॅग ची खात्री करून ती बॅग वृध्द दाम्पत्याचीच असल्याची खात्री झाल्याने सदरची बॅग श्री. भाऊलाल नागपूरे वय 71 वर्ष व त्यांची पत्नी सौ. कमलाबाई नागपूरे वय 60 वर्ष रा. नागपूर यांना सुस्थितीमध्ये वस्तुंची खात्री करुन सुर्पूद करण्यात आलेली आहे..

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक योगीता चाफले, यांचेसह मपोउपनि नेहे, पोशि- बावनकर, मपोशि मंजुटे, चामपोशी पाचे, दामीनी पथक आणि भरोसा सेल यांचेद्वारे संयुक्तरित्या करण्यात आलेली आहे….

मा. वरिष्ठांनी दामिनी आणि भरोसा सेल पथका द्वारे केलेल्या उल्लेखनीय कामगिरी चे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट