रक्षकच निघाला भक्षक…मद्यधुंद पोलीसाचे पाच वर्षाच्या चिमुरडीसोबत लज्जास्पद कृत्य

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

लोणावळा:

चॉकलेटच्या बहाण्याने चिमुकलीसोबत अश्लील चाळे

लोणावळ्यातील घटनेने एकच संताप…

लोणवळ्यामधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. किल्ला विसपीरच्या पायथ्याजवळ मद्यपी पोलिसाने एका चिमुकलीसोबत लज्जास्पद कृत्य केले आहेत. तर हा प्रकार कोणाला सांगू नको म्हणत चॉकलेटचं आमिष दिलं. परंतु घडलेला प्रकार मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितला आणि पोलिसाचं बिंग फुटलं. या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात मद्यपी पोलिसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारी वरून लोणावळा पोलीस मद्यपी पोलिसाची चौकशी करित आहेत.
सचिन सस्ते असं पोलिसाचं नाव आहे. विशेष बाब म्हणजे, आरोपी पोलिस लोणावळा पोलीस स्थानकात कार्यरत आहे आणि गुन्हा ही त्याच पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विसापूर किल्ल्याच्या पायथ्या जवळ एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत लज्जास्पद कृत्य केले. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता. याच नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत दुष्कृत्य केले.
याप्रकरणी सचिन सस्ते ला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हा धक्कादायक प्रकार नाताळदिवशीच घडला. नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून पोलीस सचिन सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेतली अन त्याने जेवण केलं. त्याच भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेंव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला सस्ते ने पाहिले. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला अन चिमुकलीसोबत नको ते चाळे केले. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला अन पोलीस सचिन सस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत आहे, त्याचं पोलिसांनी त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन त्याला अटक केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट