पोलीसांचे प्रश्न निवारणासाठी विधान परिषदेत एक आमदार हवाचप्रमोद वाघमारे यांचे प्रतिपादन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

नागपूर:-नागपूर, सिटी डेस्क. पोलिस कर्मचारी जनतेच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावित आहेत. परंतु घर आणि ड्यूटी अशी दुहेरी जबाबदारीला त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिसांचे प्रश्न सोडविण्याकरिता विधानपरिषदेत एक आमदार हवाच, अशी मागणी पोलिस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी केली.

सीताबर्डी पोलिस कॉर्टर येथे पोलिस बॉईज असोसिएशन नागपूर जिल्हा कार्यकारणीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून पोलिस बॉईज मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सय्यदराजा मुजावर तर प्रमुख पाहुणे म्हणून भुवनेश्वर निमगडे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी असोसिएशन नागपूर जिल्हाच्या नव्या कार्यकारणीमधील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल दामोदर, उपजिल्हा उपाध्यक्ष राजेश ढोरे, शहर अध्यक्ष चंकी पांडे, ग्रामीण अध्यक्ष पवन दामले, उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नवनियुक्त कार्यकारणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट