भावी मुख्यमंत्री म्हणुन श्री. बाळासाहेब थोरात यांची पोस्ट होतेय व्हायरल…
उपसंपादक-रणजित मस्के
शहापूर :- आमचे नेते, मार्गदर्शक, मा. महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, श्री.बाळासाहेब थोरात साहेब यांच्या समर्थणार्थ, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला बॅनर काही दिवसांपूर्वी शहापूर तहसील कार्यालय येथे लावला असता न्यूज 18 लोकमत, TV 9 मराठी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियातील अनेक पत्रकार बांधवांनी त्याची दखल घेत बातमी संबंध महाराष्ट्रभर पोहचवली. त्यामुळे राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी सुध्दा या बातमीची दखल घेतली.
विशेष करून आमचे गुरुवर्य बाळासाहेब थोरात साहेब (आबा) यांनी सुद्धा सदर बातमीची दखल घेत संगमनेर येथील एका कार्यक्रमात आवर्जून उल्लेख केला तसेच थेट फोनद्वारे संपर्क साधला हे माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे. कुठल्याही प्रकरचा राजकीय वारसा नसणाऱ्या, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील माझ्या सारख्या कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्या प्रमाणे थोरात व तांबे परिवाराने दिलेले प्रेम, आपुलकी, कदापि न विसरण्यासारखे आहे. पाठीवर असलेली त्यांची कौतुकाची थाप कायम मला प्रेरणा देते. मी कायम त्यांचा ऋणाईत राहिल. त्यांच्या आशिर्वादामुळे जनसामान्यांची सेवा अविरत चालू राहील अशी मी ग्वाही देतो.
पुन्हा एकदा थोरात साहेबांचे व सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार व धन्यवाद…..!
श्री गणेश धोंडू चौधरी
ता. शहापूर, जि. ठाणे. यानी मानले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com