कवठेमहांकाळ येथील दरोडयाच्या गुन्हयातील आरोपीस जिवावर उदार होवून पोलीसांनी घेतले ताब्यात…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-पोलीस स्टेशन
कवठेमहांकाळ पोलीस ठाणे
अपराध क्र आणि कलम गुरन ३३५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२), ३११.
दिगंबर रावसाहेब करे, रा करेवाडी ता कवठे महांकाळ जि सांगली.
गु.दा.तर वेळ
माहिती कशी प्राप्त झाली
गु.घ.ता वेळ
दिनांक २७.०७.२०२४ रोजी २३.०० वा ते दि २८.०७.२०२४ रोजी सुरू रात्री ०३.०० वा चे दरम्यान आरेवाडी व केरेवाडी फिर्यादी नामे दिगंबर करे व साझीदार बांचे राहते घरी
दि २८.०७.२०२४ रोजी १६.०१
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर अपर पोलीस अधीक्षक, सांगली. श्री. सुनिल सांळुखे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जत उपविभाग, जत श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग, मिरज श्री संतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांचे मार्गर्शनाखाली श्री. जोतिराम पाटील, पोलीस निरीक्षक, क. महांकाळ पो. ठाणे,श्री. भैरु तळेकर, पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे. कवठे महंकाळ पो. ठाणेकडील सपोनि दत्तात्रय कोळेकर, पोउनि विनायक मसाळे, पोउनि वैभव पाटील, पोहेकों / १२१६ वाघमोडे, पोहेको / १५३ कांबळे, पोना / २१२२ मासाळ, पोना / १५४१ माने, पोना/८१८ व्हटकर, पोशि/१४१९ करांडे, पोशि/१२८४ कासार, पोशि/ २३४८ हिप्परकर (पिटर मोचाईल चालक), पोना / १७८१ पाटील (डायल ११२ चालक)
मिरज शहर, मिरज ग्रामीण, महात्मा गांधी तसेच कुपवाड-एमआयडीसी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील अधिकारी व अमंलदार.
अटक वेळ व दिनांक
आरोपी क्र ०१ ग्रास दि. २८.०७.२०२४ रोजी २०.४५ वा. अटक करणेत आली असुन आरोपी क्र. २ ते ४ यांना दिनांक २९.०७.२०२४ रोजी १७.०७ बा अटक केली आहे. आरोपीचे नांव पत्ता
१) चारशिट्टया भिमा शिंदे वय ५७ वर्षे रा लिंगपुर ता मिरज जि सांगली
२) विनोद ऊर्फ उद्देश सुभाष पवार, वय २३ वर्षे रा. भोसे ता. मिरज जि. सांगली
३) श्रीनाथ सुभाष पवार, वय १९ वर्षे रा. भोसे ता. मिरज जि. सांगली
४) विष्णु सुभाष पवार, वय २० वर्षे रा. भोसे ता. मिरज जि. सांगली
५) अल्पवयीन बालक.
जप्त मुद्देमाल
१) ३५,०००/- रु. सी बी झेड कंपनीची मोटार सायकल तिचा आर टी ओ नं एम एच १० ए एस १४९२ असा असलेली जु बा किं अं
२) २०,०००/- रु. किमतीची फॅशन विना नंबर प्लेटची मोटर सायकल जु या कि अं
३) १,५००/- रु. किंमतीचे पितळीचे समई (२) नग
४) १००/- रु. किंमतीचे मेटेलचे अस्तीचे ताट
५) १००/-
रु. एक लाकडी मुठीचा चाकु एका बाजुस धारधार असलेला त्याची मुठीची लांबी १० से. मी मुठी पासुन १५ सें मी धारधार पात्याचा जु बा कि अं
६) ५०/- रु. एक चॉकलेटी रंगाची सेंक त्यास एकुण ४ कप्पे असलेला समोरील बाजुस इंडीया बैंग असे इंग्रजीत लिहलेले
७) ५०/- रु. किमतीची स्टीलची कात्री त्याची एकुण लांबी २०.५ से मी. असलेली जु वा किं अं
८) ००/- रु. सहा चाव्याचा गुच्छ
१) १००/- रु एक लाल रंगाचे चार्जर्जीगची बॅटरी जु.वा.कि.अं.
१०) ६०,०००/- रु १२ ग्रॅम वजनाचे काळ्या मण्यासहित सोन्याचे मंगळसूत्र जु.वा.कि.अं
१,१६,१००/- रु. एकूण (एक लाख सोळा हजार नउशे रुपये.)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दि. २८/०७/२०२४ रोजी रात्री ०१.५६ वा चे सुमारास डायल ११२ वरती कॉल आला की, आरेवाडी/केरेवाडी या ठिकाणी दरोड्याचा प्रकार घडला आहे. त्यावेळी पो.नि. ज्योतीराम पाटील, कवठे महंकाळ पोलीस ठाणे यांना जत विभागीय रात्रगस्त होती. त्यांना डायल ११२ वरील ड्यूटीस असलेले पोलीस अंमलदार यांनी घटनेची माहिती दिली. लागलीच पो.नि. ज्योतीराम पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन ते तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी गेले. लागलीच घडले प्रकाराची माहिती घेवुन नियंत्रण कक्ष, सांगली, जिल्हा रात्रमस्त करीता असलेले प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग, मिरज व सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग, जत यांना तात्काळ माहिती दिली.
दरम्यान डायल ११२ वरील पोलीस अंमलदार व पो.नि. पाटील यांनी फिर्यादीकडे विचारपुस केली असता फिर्यादीने त्यांचा मोबाईल व मौल्यवान वस्तु अनोळखी आरोपी यांनी जबरदस्तीने कावुन घेवुन गेले असल्याची पोलीसांना हकिकत सांगीतली. त्यावेळी डायल ११२ वरील पोलीस अंमलदार व पो.नि. पाटील यांनी सायचर पोलीस ठाणेकडुन चोरीस गेलेल्या मोवाईल नंबरचे लोकेशन घेतले असता त्याचे लास्टचे लोकेशन पवार बस्ती, केरेवाडी येथील शेतामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पो.नि. पाटील व डायल ११२ वरील पोलीस अंमलदार व पोलीस स्टाफ असे पवार वस्ती, केरेवाडी येथील शेतामध्ये अनोळखी आरोपी यांचा शोध घेत होते.घटनास्थळी पोलीस पोहोचले हे पाहताच आरोपी हे घटनास्थळावरुन केरेचाडीकडून सांगली दिशेने एनएच-१६६ महामार्गावरून दोन दुचाकी मो.सा. वरुन निघाले होते. त्यांचा पाठलाग करताना एक दुचाकी मो.सा. सांगलीच्या दिशेने पुढे गेली. त्या मो.सा. चा पाठलाग डायल-११२ वरील अंमलदार करीत होते. दुसऱ्या मो.सा. वरील आरोपींचा पाठलाग जिल्हा रात्रगरतीस असलेले प्रणिल मिल्दा, पो.नि. पाटील हे करीत असताना आरोपींची मो. सा. स्लीप होवुन आरोपी खाली पडले. त्यावेळी आरोपींनी मो.सा. जागीच सोडुन रस्त्याचे डावे बाजुकडील शेतामध्ये पळण्यास सुरुवात केली. पोलीसांनी आरोपींना तुम्ही पळून जावु नका आम्ही पोलीस आहोत असे ओरडुन सांगीतले असता ते पोलीसांचे सुचनेकडे दुर्लक्ष करून न जुमानता तिन्ही इसम शेताकडे पळून जावु लागले. तेव्हा जिल्हा रात्रगस्तीस असलेले प्रणिल गिल्दा व सोबतचा स्टाफ आरोपीचा पाठलाग करीत असताना पोलीसांनी पाठलाग करु नये म्हणुन ते पोलीसांचे दिशेने दगड फेकुन मारु लागले. त्यामुळे पोलीसांचे जिवीतांचा विचार करुन प्रणिल गिल्डा यांनी त्यांचेकडील सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून दरोडेखोरांच्या दिशेने हवेत फायर केला. त्यानंतर आरोपी यांचा तसाच पाठलाग सुरु ठेवुन त्या तिन्ही आरोपी पैकी एका आरोपीला शिताफीने घातक हत्यारानिशी ताच्यात घेतले. त्यावेळी त्यास त्याचे नांव गाव विचारता त्याने त्याचे नांव चारशिट्या भिमा शिंदे, वव ५७ वर्षे, रा. बोलवाड, ता.मिरज, जि. सांगली असे सांगीतले. त्यानंतर आरोपीकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच सदर गुन्ह्यातील वंरीत आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी बड्डी, पाटगांव व भोसे या ठिकाणी आलेले आहेत. मिळाले बातमीप्रमाणे आरोपीना ताच्यात घेण्यासाठी पोलीसांनी वेगवेगळ्या टिम तयार करून त्या भागात छापा टाकला असता सदरचे संशयीत इसम डोंगर व जंगल याचा फायदा घेवुन चार इसम हे हायवेकडुन दंडोबा डॉगाराच्या दिशेने जात असल्याचे दिसले. सदर इसमांचा मिरज विभाग, जत विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, इकडील अधिकारी व अंमलदार यांनी ८ ते १ तास त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई हि पाऊस सुरु असताना चिख्खल व वाट निसरडी झाली असताना सुध्दा पोलीसांनी त्यांना सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले आहे. सदर मुन्द्यामध्ये एकुण ४ आरोपी अटक करण्यात आले असुन त्यांची मा. न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.
तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील निलजी येथे झालेला जबरी चोरी करुन बलात्कार केलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीचाचत योग्य माहिती मिळाली असुन त्या अनुशंगाने अधिक तपास सुरु असुन लवकरच सदर आरोपीना ताब्यात घेत आहोत.
मा विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे कौतुक केले व ५ पोलीस अंमलदार यांना बक्षीस जाहिर केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com