सुमारे २९ वर्षापासून फरार असलेला खूनाचे व आरोपी पलायनाचे गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अटक..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:-दिनांक २०/०४/१९९५ रोजी गु.र.नं. १ ३०/१९९५ भादविसं कलम ३०२ हा गुन्हा सफाळा पोलीस ठाणे येथे दाखल आहे. सदर गुन्हयात दिनांक १९/०४/१९९४ रोजी रात्री ०८.३० वा. चे सुमारास मौजे आगरवाडी ऐमेटी कंपनीच्या पाठीमागे जिवदानी पाडा महादेव चौधरी यांचे वाडीत यातील मयत मोहन सुकुर दुबळी, वय ५० वर्षे, रा. विरार व आरोपी हरेश बाबू पटेल, वय २५ वर्षे, रा. आगरवाडी ता.जि. पालघर व मुळ रा. आसमा खतरी फलीया ता. पारडी, जि. बलसाड गुजरात राज्य हे बांधकाम करीत असतांना त्यांचेत काहीतरी कारणावरुन बोलाचाली होवुन, आरोपीने मयत यास शिवीगाळी करुन, मयत यास खाली पाडून फावडयाने मयताचे पाठीवर, छातीवर, हातावर कमरेवर उपटी मारुन जखमी करुन, जिवे ठार मारुन पळून गेला. गुन्हयाचे तपासात नमुद आरोपीस त्याचे मुळ गावाहून दि. २१/०४/१९९५ रोजी २३.१५ वा. अटक करुन त्यास मा. न्यायालयाने दि. २६/०४/१९९५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली होती. आरोपीचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान दि. २६/०४/१९९५ रोजी पहाटे ०५.२० वा. चे सुमारासा नमुद आरोपी हा पोलीसांचे तावडीतुन पळून गेलेला होता. त्यावरुन नमुद आरोपी विरुध्द सफाळा पोलीस ठाणे गु.र.नं. ।। ०४/१९९५ भादंविसंक २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपीचा शोध चालू होता.

यातील आरोपी नामे दि. २६/०४/१९९५ रोजी पोलीस कस्टडी रिमांड मधुन पळून गेलेला होता. त्याचा मुळ गावी व आजुबाजुस आजपावेतो तपास करता तो मिळुन आलेला नव्हता.

श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोनि/अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/रविंद्र वानखेडे, श्रे. पोउनि/राजेश वाघ, पोहवा/२२६
राकेश पाटील, पोहवा/मुद्दसर दांडेकर यांचे विशेष तपास पथकाने वरील दोन गुन्हयांतील आरोपीचा कसाशीने शोध घेवुन सुमारे २९ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे हरेश बाबू पटेल ऊर्फ नायका, वय ५५ वर्षे, रा. आसमा खतरी फरीया, ता. पारडी, जि. बलसाड, गुजरात राज्य यास दि.०२/०४/२०२४ रोजी पारडी जि. बलसाड गुजरात राज्य येथुन ताब्यात घेतले. सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता सफाळा पोलीस ठाण्याचे स्वाधीन केलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. अविनाश मांदळे, नेम. सफाळा पोलीस ठाणे हे करीत आहोत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट