जमिनीचे वादातुन संजय भोईर याच्या हत्येचा ३६ तासात उलगडा करून मानपाडा पोलीसांनी आरोपीतास केली अटक…

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

डोंबिवली :-मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली पुर्व, पोलीस ठाणे हद्दीत ” मयत नामे श्री. संजय सखाराम भोईर, वय ४३ वर्षे, यांची हत्या करणारे अज्ञात आरोपी यांचा शोध घेणे करीता. मा. श्री. दत्तात्रय शिंदे सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व मा. श्री. सुनिल कुराडे साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांनी यातील मयत यांस जिवे ठार मारणारे अज्ञात आरोपीत यांचा घटनास्थळाचे आसपासचे परिसरातील सी सी टिव्ही फुटेज आधारे, तसेच तांत्रिक विश्लेषण आधारे तात्काळ शोध घेणे बाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या.

त्याप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि विजय कादबाने साो, यांनी पोलीस ठाण्याचे सदर गुन्हयाचे तपास अधिकारी पोनि/दत्तात्रय गुंड, व गुन्हेप्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करून वरिष्ठांनी दिलेले सुचनांप्रमाणे मार्गदर्शन करून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपीत यांचा तांत्रिक विश्लेषना आधारे तपास करून तसेच बातमीदाराच्या मार्फतीने गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून अटक आरोपी नामे विकास श्याम पाटील, वय ३८ वर्षे, व्यवसाय रिक्षा चालक रा स्वःताचे घर हिस्सा नं १७४ लक्ष्मी किराणा स्टोअर्स जवळ उंबार्ली रोड डोंबिवली पुर्व, कायमचा पत्ता घर नं २०३ मु उंबार्ली पोस्ट खोणी ता अंबरनाथ जि ठाणे, यांस ताब्यात घेवून त्याचे कडे मानपाडा पो.स्टे.गु.र.नं. ७३६/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२,३४ प्रमाणे. दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने त्याचे सोबतचा साथीदार यांचे मदतीने यातील मयत नामे श्री. संजय सखाराम भोईर, वय ४३ वर्षे, रा. स्वतःचे घर क्र. ५१ अ/ब, मैदान जवळ, मानपाडा उंबार्ली रोड, मु. उंबार्ली, पो. खोणी, डोंबिवली पूर्व, ता.अंबरनाथ, जि.ठाणे, व अटक आरोपी यांचे मध्ये असलेला जुना जामिनीचे वादातुन अटक आरोपीताचा काटा काढणार असल्याचा आरोपीत संशय होता त्याचा मनात राग धरून यातील मयत यांस त्यांनी आपसात संगनमत करून एकांतात अंधाराचा फायदा घेवुन व त्यांस ऐकांतात गाठुन धारदार शस्त्राचे साहयाने गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्यात आले असल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करून त्याचे मदतीने पाहिजे आरोपी त्याचा साचीदार याचा शोध घेणे चालु असुन सदर गुन्हयाचा तपास पोनि/दत्तात्रय गुंड हे करत आहे.

सदरची कामगिरी श्री. दत्तात्रय शिंदे साो, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व मा. श्री. सुनिल कुराडे साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विजय कादयाने वपोनि, पोनि राम चोपडे, पोनि दत्तात्रय गुंड, पो. निरी. राहुल मस्के, सपोनि. प्रशांत आंधळे, सपोनि. महेश राळेभात, सपोनि. संपत फडोळ, पोहवा/राजेंद्र खिलारे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा / सुनिल पवार, पोहवा./संजु मासाळ, पोहवा./विकास माळी, पोहवा./शिरीष पाटील, पोहवा / दिपक गडगे, पोहवा/निसार पिजारी, पोना./गणेश भोईर, पोना./ प्रविण किनरे, पोना/अनिल घुगे, पोना./ शांताराम कसबे, पोना. देवा पवार, पोना./यलष्पा पाटील, पोना/रवि हासे, पोना/ चिंतामण कातकडे, पोशि/गणेश बडे, पोशि./नाना चव्हाण, पोशि./विजय आव्हाड, पोशि./अशोक आहेर, पोशि./महेंद्र मंजा, यांचे पथकाने केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट