अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून खुन करणा-या आरोपीच्या खालापूर पोलीसांनी आवळल्या मुसक्या…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

रायगड: दिनांक १८/१२/२०२२ रोजी ग्रामपंचायत निवडणुक मतदान प्रक्रीया बंदोबस्त सुरू होता. त्याच वेळी सायंकाळी १९.०० वाजण्याचे सुमारास स्थानिक लोकांकडुन माहीती मिळाली कि, मौजे कारगाव, पो. खांबेवाडी, ता. खालापूर या ठिकाणी जंगलभागात एका ०८ वर्षाचे मुलीचा मृतदेह मिळाला असुन तीचे चेह-यावर जखमा आहेत अशी माहीती मिळाल्याने खालापूर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी खाना झाले. दरम्यान पोलीस निरीक्षक श्री. बाळा कुंभार यांनी सदरची बाब मा. पोलीस अधीक्षक रायगड, मा. अपर पोलीस अधीक्षक रायगड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विभाग खालापूर यांना फोनव्दारे कळविली व तात्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी अपघात ग्रस्तांचे मदतीकरीता हे पथक देखील मदतीला हजर होते.

तसेच त्या ठिकाणी स्थानिक नागरीक देखील उपस्थित होते.सदरची माहीती कळताच मा. पोलीस अधीक्षक रायगड, श्री. सोमनाथ घार्गे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक रायगड श्री. अतुल झेंडे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अधिकारी व त्यांचे पथक तसेच इतर पोलीस अधिकारी असे घटनास्थळी पोहचले.

घटनास्थळी मयत स्थितीत पडलेली मुलगी ही मौजे कारगाव येथील असल्याचे समजले. घटनास्थळाची परस्थिती पाहता यातील मयत हिस झालेल्या जखमा या हिंस्त्र प्राण्याने केलेल्या असाव्यात असे वाटत असल्याने पोलीस निरीक्षक श्री. कुंभार साहेब यांनी वन विभागाचे अधिकारी श्री. राजेंद्र पवार यांना फोन करून सदरची माहीती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर श्री. मुसळे, रा. कारगाव, पो. खांबेवाडी, ता. खालापूर यांनी त्यांची मुलगी हिस हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात जखमी होवुन मयत झाली म्हणुन खबर दिल्याने खालापूर पोलीस ठाणेकडे अकस्मात मृत्यु रजि. नंबर ७५/२०२२ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यातील मयत हिचे मृत्युचे नक्की कारण समजुन येण्याकरीता तीचे प्रेत सर जे. जे. रूग्णालय मुंबई येथे पाठविण्यात आले.

त्यानंतर दिनांक १९/१२/२०२२ रोजी यातील मयत हिचे प्रेत पोस्टमार्टमकरीत सर. जे. जे. रुग्णालय मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी, सर जे. जे. रुग्णालय मुंबई यांनी मयत हिचे प्रेतावर पोस्टमार्टम करून यातील मयत हिचा मृत्युबाबत त्यांनी DEATH DUE TO STRANGULATION WITH HEAD INJURY ( UN-NATURAL ) असे स्पष्ट मत दिले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांचेशी समक्ष चर्चा केली असता त्यांनी वैद्यकीय अधिकारी सर जे. जे. रुग्णालय मुंबई यांनी यातील मयत हिस गळा दाबुन त्यानंतर तीचे डोक्यात हत्याराने जखम केल्याने मयत झाल्याचे सांगितल्याने अज्ञात आरोपी विरूद्ध खालापूर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ४१४ / २०२२ भा.द.वि.स. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळाची परस्थिती पाहता यातील मयत हिस कोणत्यातरी हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचे वाटत होते. यातील मयत यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जिवे ठार मारले होते. परंतु कोणतेही पुरावे घटनास्थळी किंवा आजुबाजुचा परिसरात मिळुन येत नव्हते. तसेच घटनास्थळ हे जंगलभागात असल्याने त्या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे, अथवा इतर माहिती उपलब्ध होत नव्हती. तसेच कारगाव गाव व घटनास्थळ हे अत्यंत जवळ असल्याने तांत्रीक बाबींची पडताळणी करणे देखील अत्यंत अवघड होते. तसेच त्या दिवशी गावामध्ये क्रिकटचे सामने आयोजीत केल्यामुळे आजुबाजुच्या गावातील मोठया प्रमाणावर क्रिकेटचे संघ व प्रेक्षक गावामध्ये त्यामुळे त्या प्रत्येकाकडे चौकशी करणे अत्यंत जिकरीचे झाले होते. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे व गुन्ह्याची उकल करणे अत्यंत कठीण होते.

परंतु पोलीसांनी मा. पोलीस अधीक्षक रायगड, मा. अपर पोलीस अधीक्षक रायगड, यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्या ठिकाणी तळ ठोकून होते. त्यांचे सोबत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. दयानंद गावडे व त्यांचे पथक यांचे सह पोलीस
निरीक्षक खालापूर श्री. बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक खोपोली श्री. शिरीष पवार, पोलीस निरीक्षक रसायनी श्री. अश्वनाव खेडकर, पोलीस निरीक्षक पाली श्री. विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक नेरळ श्री. राजेंद्र तेडुलकर, यांचे नेतृत्वात सपोनि / श्री गणेश कराड, सपोनि / श्री. बालवडकर, सपोनि / श्री. सावळे, महिला सपोनि / बोराटे, महिला पोलीस उप-निरीक्षक श्रीमती काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक श्री. महेश कदम व पोलीस स्टाफ यांची वेगवेगळी तपास पथके तयार केली. सर्व तपास पथक यांना घटनेचे गांभय सांगून पोलीसां समोरील आव्हानांची माहिती दिली व गुन्हा उघडकीस आणण्याचे – पटीने योग्यत्या सुचना व मार्गदर्शन केले. तपासादरम्यान ब-यास संशयीत लोकांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी करण्यात आली परंतु पोलीसांना यश प्राप्त होत नव्हते.

त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक श्री. महेश कदम व त्यांचे पथकाने यातील मयत हिस जंगलाचे दिशेने जाताना पाहणा-या शेवटच्या इसमाकडे पुन्हा चौकशी केली. त्यावेळी चौकशी दरम्याने तो घाबरलेला व प्रत्येक चौकशीचे वेळी वेगवेगळी माहीती देवु लागल्याने पोलीसांचा त्याचेवर संशय बळावला. संशयीत आरोपी प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देत होता. त्यामुळे त्याचेकडे सखोल व कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास केला असता आरोपीत याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचेकडे गुन्हा करण्याचा उद्देशा बाबत तपास केला असता त्याच्या लैंगिक भावना उत्तेजित झाल्या व त्याच दरम्यान मयत मुलगी आराध्या ही त्याचे समोरून एकटी जंगल भागाकडे गेल्याने त्या परस्थितीचा फायदा उचलण्याच्या हेतुन त्याने तीचा पाठलाग करून तीस घटनास्थळी वळजबरीने घेवुन जावुन तीचेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती घरी नाव सांगेल या भितीने तीचा गळा दाबुन व त्यानंतर तीचे डोक्यात दगड घालून तीस जिवे ठार मारून खुन केला आहे.

सदर गुन्ह्याचे कामी आरोपीत अजय विजय चव्हाण, रा. कारगाव, ता. खालापूर यास अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालयास हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दिनांक ३०/१२/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री. बाळा कुंभार व सहकारी तपास पथक हे करीत आहेत.

सदरची कौशल्यपूर्ण कामगिरी मा. पोलीस अधीक्षक रायगड श्री. सोमनाव घार्गे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक रायगड श्री. अतुल झेंडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर, श्री. संजय शुक्ला, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा श्री. किरण सुर्यवंशी, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. दयानंद गावडे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक खालापूर श्री. बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक खोपोली श्री. शिरीष पवार, पोलीस निरीक्षक रसायनी श्री. अश्वनाथ खेडकर, पोलीस निरीक्षक पाली श्री. विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक नेरळ श्री. तेंडुलकर, सपोनि / श्री गणेश कराड, सपोनि / श्री. बालवडकर, सपोनि / श्री. अजित सावळे, महिला सपोनि / तृप्ती बोराटे, पोलीस उप निरीक्षक प्रदिप आरोटे, महिला पोलीस उप-निरीक्षक श्रीमती सरला काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक श्री. महेश कदम व खालापूर पोलीस ठाणे कडील पोह/ निलेश सोनावणे, पोह/तुपार सुतार, पोह/ नितीन शेडगे, पोना / हेमंत कोकाटे, पोना / सचिन व्हसकोटी, खोपोली, रसायनी, नेरळ पोलीस ठाण्याकडील सहा. फौजदार गणेश गिरी व पोह/ शरद फरांदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोह/ प्रतिक सावंत, पोह/ सुधीर मोरे, पोह/ राकेश म्हात्रे सायबर सेल कडील स्टाफ यांनी पार पाडलेली आहे.

पोलीसांचे या कामगिरी बाबत स्थानिक नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट