कोयत्याने वार करुन खून करण्याचा प्रयत्न करणारा मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासाचे आत केले जेरचंद.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दि.०६/०६/२०१३ रोजी २०.३० वा.चे. सुमारास क्षेत्रमाहुली ता. जि. सातारा येथील फिर्यादी यांचे घरातील हॉलमध्ये फिर्यादी यांचे मालकीचे जागेत टाकलेली पानटपरी काढायला लावली म्हणून दोन इसमांनी फिर्यादी यांचेकडे माफी मागण्याच्या बहाण्याने येवून त्यांचे कपाळावर, डोक्यात तसेच डावे हाताचे तळहातावर व त्यांची पत्नी यांचे उजवे हाताचे पंजाच्यावर तसेच फिर्यादी यांचा मित्र याचे डाव्या हाताचे कोपन्यावर, उजवे हाताचे बोटावर कोयत्याने वार करुन फिर्यादी व त्यांची पत्नी यांना गंभीर जखमी केली म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.४६२/२०२३ भादविक ३०७, ३४ अन्वये गुन्हा नोंद आहे.

नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना नमुद गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक तयार करून त्यांना नमुद गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

गुन्हयातील मुख्य आरोपी हा मसुर फाटा येथे शेतात असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी तपास पथकास गुन्हयातील मुख्य आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे तपास पथकाने मुख्य आरोपीचा मसुरफाटा येथील शेतात अहारोत्र शोध घेवून त्यास ताब्यात घेवून पुढील तपासकामी सातारा शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले असून गुन्हयातील आरोपी १२ तासाचे आत जेरबंद केला.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद चेचले, प्रविण फडतरे, राकेश खांडके, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, मोहन पवार, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, अमृत कर्पे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट