बोरिवली रेल्वे पोलीसांनी महिलांच्या डब्यात सापडलेला डेल कंपनीचा लॅपटॉप प्रवासी स्नेहा यांना केला परत…

प्रतिनिधी- मंगेश उईके
बोरिवली :-मपोशी, १२२० दराडे व पोशि/२६६ कोकणी निवेदन करते की रात्रपाळी ड्युटी कमी २१.०० ते १९.०० वाजेपर्यंत बोरिवली रेल्वे स्टेशन येथे फलाट नंबर ४ वर गस्त करत असताना चर्चगेट बोरिवली गाडी येत असून त्यामध्ये विरारबाजूकडील लेडीज कंपार्टमेंट मध्ये एक काळ्या रंगाची डेल कंपनीची लॅपटॉपबॅग मिळून आली असता त्यामध्ये डेल कंपनीचा ४५,००० रू किमतीचा लॅपटॉप व चार्जर मिळून आल्याने सदरची बॅग बोरवली रेल्वे पोलीस ठाणे येथे आणून ठाणे अंमलदार पोहवा/३३४४ भाऊसाहेब जाधव यांच्यासमोर पडताळणी केली.
सदर प्रवासी नामे स्नेहा बाई वय ४३ वर्षे मो.न.८५९१२८४२८० यांना मोबाईल फोनवर संपर्क साधला असता बोरवली रेल्वे पोलीस ठाणे येथे बोलावून लॅपटॉपची बॅग त्यांचीच आहे का याची खात्री करून त्यांच्या ताब्यात दिली.
रेल्वे पोलिसांनी केलेल्या कामगिरी बद्दल पोलीसांचे खूप खूप आभार मानले. सदरील प्रकरण वरिष्ट पोलीस निरीक्षक, खुपेरकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली हातळणेत आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com