कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न करता पत्रकार सदोदित काम करतो -जिल्हा पोलीस प्रमुख यांसकडून विशेष स्तुतिसुमने …

उपसंपादक – रणजित मस्के
शहादा:लोकशाहीत पत्रकारांना चौथा स्तंभ मानले जाते. पत्रकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहिल्यास प्रगतीची कामे निश्चितच होतात. कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न करता पत्रकार सदोदित काम करतात असे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख पी. आर. पाटील यांनी शहादा येथे पत्रकारांच्या सन्मान कार्यक्रमात केले.

शहादा येथील अतिथी बँकेट हॉलमध्ये शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा व सामाजिक संस्थांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा पोलीस प्रमुख पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, तहसीलदार दीपक गिरासे, शहादा पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक दिनेश सिनारे, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, विजय सावळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, पत्रकार निलेश पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना पी. आर.पाटील म्हणाले की, पोलीस खात्यात गुप्त माहितीसाठी गुप्तचर खाते असते परंतु त्या अगोदरही माहिती पत्रकारांना कळते. पत्रकारांनी वर्षभरात तर निश्चितच पोलिसांकडून योग्य सन्मान करण्यात येईल त्यासाठी एक समितीही गठीत करनार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तहसीलदार दीपक गिरासे म्हणाले की, चांगले काम करीत असताना परिश्रम घेतले. अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. चढाओढ चालूच असते. समाजात चांगले काम करणारे नेहमी चिंतीत असतात, काळजीत असतात. जो चिंतित असतो काळजीत असतो तो सर्वतोपरी चांगले काम करीत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार सुनील सोमवंशी, संकल्प ग्रुपचे विजय चव्हाण, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी समानार्थी पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते मानवस्र, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले यांनी केले त्यात त्यांनी तालुका पत्रकार संघातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध तालुकास्तरावर चांगले काम केले उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित पाटील यांनी तर आभार मनोज बिरारी यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी शहादा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सुनील सोमवंशी, गिरधर मोरे, प्रा. डी.सी. पाटील, प्रा. नेत्रदीपक कुवर, जगदीश जयस्वाल, रघुनाथ बेलदार व रमेश पाटील यांचा तसेच संकल्प ग्रुप शहादा व युवक मित्र परिवार नंदुरबार या सामाजिक संस्थांना मान्यवरांच्या हस्ते मानवस्त्र, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com