जिजाऊ संघटनेत बोईसर शहरातील मुस्लिम समाजातील युकानी मोठया संख्येने जाहीर प्रवेश केला…!

उपसंपादक : मंगेश उईके
बोईसर :-दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ बोईसर शहरातील मुस्लिम समजतील युवकांनी मोठ्या संख्येने जिजाऊ संघटने मध्ये जाहीर प्रवेश केला आणि आगामी विधान सभा निवडणुकीमध्ये जिजाऊ संघटनेचे अधिकृत उमेदवार नरेश धोडी यांना रिक्षा चिन्हावर मतदान करून भरघोस मतांनी निवडून आण्याचा संकल्प केला.जिजाऊ संस्थेच्या वतीने आरोग्य,शिक्षण,युवकांना रोजगार,या सर्व क्षेत्रामध्ये सुरू असलेले सामाजिक काम पाहता आपण सर्वांनी या संघटने मध्ये प्रवेश केला आहे असे प्रतिपादन मौलाना इर्शाद खान साहेब यांनी केले.या सोहळ्याला जिजाऊ संघटना बोईसर विधान सभेचे उमेदवार नरेश प्रकाश धोडी , याहया भाई खान,इरफान भाई खान तसेच जिजाऊ कामगार संघटनेचे सहसचिव राहुल जाधव,अझहर शेख प्रामुख्याने उपस्थित होते.





येणाऱ्या प्रत्येक दिवशी जिजाऊ संघटने मध्ये मोठ्या संख्येने होत असलेले पक्ष प्रवेश आणि जनतेचा वाढत चाललेला प्रतिसाद पाहता या विधान सभा क्षेत्रात होणाऱ्या चौरंगी लढती मध्ये जिजाऊ संघटना प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का देईल का हे पाहण्यासारखे असेल.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com