लष्कर पोलीस स्टेशनचे तपास पथकाने भिकारी असल्याचा वेष धारण करुन घरफोडी चोरी करणा-या एक इसमाला व मोबाईल विकत घेणा-या एका आरोपीला अटक करुन त्याचेकडून चोरीस गेले १४ महागडे मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली कटावनी असा एकूण ९,४५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे: गुन्हयाची थोडक्यात हकिगत-

लकर पो स्टे गुन्हा रजि नंबर २५/२०२३ भादवि कलम ४५७.३८० मधील फिर्यादी नामे रितेश श्याम नयले ३२ वर्षे धंदा-व्यवसाय रा. सुखकर्ता अपार्टमेंट स्वामी विवेकानंद नगर पुणे १३ या फिर्यादीने फिर्याद दिली की, दि.२२/०१/२०२३ रोजी रात्री ०८/०० या से वि.२३/०१/२०२३ रोजी सकाळी ०६/०० याच्या सुमारास फिर्यादीचे पावित इंटरप्राईजेस नावाचे मोबाईल दुकानातुन १७ एमजी रोड करायी स्वीट जवळ कैम्प पुणे कोणीतरी अज्ञात इसमाने दुकानाच्या शटर तसेच गेम बिल्डींगचे शटर चे लॉक कशाच्यातरी सहाय्याने तोडून दुकानातील सॅमसंग कंपनीचे १८ मोबाईल एक मायक्रोसॉफ्ट कंपनीचा लॅपटॉप व भारतीय चलनातील रोख रक्कम लाख असे एकूण १८, १०,५००/- रुपये चोरीस गेले म्हणुन अज्ञात इसमाविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल.

गुन्हयाची मोडस

मुख्य आरोपी यांनी दुचाकी गाडी दूर अंतरावर पार्क करून मिकारी असल्याचा वेग पारण करुन फुटपाथवर झोपण्याचा बाहना करुन मोबाईल दुकानाचे मेन शटर व दरवाजाचे लॉक तोडुन आत प्रवेश करून चोरी केली आहे.

गुन्हयाचा शोध

दाखल गुन्हयाचा शोध चालू असताना सीसीटीव्ही फुटेज मधील एक इसम मिकारी असल्याचा देशमुषा करुन चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. व गुन्हयात चोरीस गेलेले सर्व मोबाईचे आय एम ई आय नंबर ट्रेसिंगसाठी देण्यात आले होते त्याच प्रमाणे गुन्हा घडतेवेळी काढण्यात आलेला उम डाटा घेण्यात आला होता. त्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना गुन्हयातील अटक नागे केदार सुरेश शिंदे वय २३ वर्षे धंदा बिगारी रा लुहियानगर ५४ एच पी घर में २०१ गल्ली नं ०२ पुणे याने चोरीतील सॅमसंग कंपनीचे महागडे मोबाईलचा वापर केल्याचे मोबाईलचा तांत्रिक विश्लेशनच्या आधारे माहिती प्राप्त झाली त्यानुसार आरोपी नामे केदार शिंदे यांस ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी व त्याचा भाऊ नामे अजिक्य शिंदे यांनी मिळुन मुख्य आरोपी नाने असिम शब्दी शाहा वय २३ वर्षे चंदा मोबाईल विक्री] [रा [२३७] गणेशपेठ नवाब मजिदजवळ पुणे ०२ याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले त्यानुसार असिम शाह यांस दिनांक ०५/०४/२०२३ रोजी अटक करुन त्याचेकडे तपास कामी पोलीस कस्टडी रिमांड घेतली असता त्याने पोलीस कस्टडी दरम्यान दिनांक ०४/०४/२०२३ रोजी मोबाईल चोरी केल्याचे कबुल केल्याने कडुन १८ मोबाईल पैकी सॅमसंग कंपनीचे जवळपास ९,४५,०००/- रु किं १४ मोबाईलस जप्त करण्यात आलेले आहे फोर्ट ०३, आरा, सैमसंग नोट-१०, असे मोबाईल आहेत. तसेच चोरी करते वेळी शटर उघडणेसाठी वापरलेली कटावनी जप्त करण्यात आली आहे.

गुन्हयाचा तपास बाकी

दाखल गुन्हयातील आरोपी कडुन अधिक तपास करुन दाखल गुन्हयातील चोरीस गेले लॅपटॉप,
रोख रक्कम ६ लाख ५ सॅमसंग कंपनीचे मोबाईल, गुन्हा करतेवळी वापरलेली टू व्हीलर गाडी ताब्यात घेणे बाकी आहे आरोपीची दिनांक १०/०४/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. तपास सुरु आहे.

मार्गदर्शनाखाली गुन्हाचा तपास केला

सदरची कामगीरी ही मा. पोलीस उप आयुक्त श्री. रमतांना पाटील, परि. २. मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. आर राजे, लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम, श्री राजेश तटकरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रियंका शेळके, सहा पोलीस निरिक्षक शितलकुमार गायकवाड यांचे नेतृत्वाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस उप निरीक्षक कांबळे, पोशि ३१० कदम पोहवा ५६७९ कदम पो हवा ३०११ शिंदे, पो हवा ८४६ र पो हवा २९८८ भारमछ पो हवा ३०४२ मँगे, पी हवा चव्हाण, पी हवा मंगेश बो- हाडे परि०२, पोना ७८९१ कोळी पो.ना ७८०० मांजरे, पोना ७६६१ तांबोळी, पोशि राऊत यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट