महामार्गावर लुटमार करणारी आंतर राज्यीय टोळी स्था. गुन्हे शाखा गोंदियाने केली जेरबंद..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-रायपूर ते नागपूर महामार्ग क्र. 53 नैनपुर, कोहमारा येथे ट्रक चालकास धमकावून ट्रक मधील जबरीने डिझेल चोरी करणारे दोन अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांच्या जाळ्यात..

गुन्ह्यांत वापरलेल्या दोन इनोव्हा कंपनीच्या चारचाकी गाड्या, डीझेल विक्रीचे पैसे व इतर साहित्य असा एकूण किंमती 56,14,900/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. गुन्ह्यांत जप्त

याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, फिर्यादी श्री. प्रदिप मोतीलाल यादव वय 36 वर्ष रा. चकनायक जादावावर देवारा जादीद किटा पोलीस स्टेशन महाराज गंज ता. सागरी जि. आजमगड, राज्य – उत्तप्रदेश हा भारत बेंझ कंपनीचा ट्रक क्र. एम.एच 40 /एके- 2557 चा चालक असून गडचिरोली जिल्हयातील सुरजागड पहाडी वरून आयरन मिटटी रायपूर जवळ जय बजरंग इस्पात फॅक्टरी मध्ये घेउन जात असताना घटना दिनांक – 24/09/2024 चे रात्री 01.40 वाजता चे सुमारास फिर्यादि हा आपल्या ताब्यातील ट्रक ने सुरजागड पहाडी गडचिरोली येथून आयरन मिटटी रायपूर येथे घेउन जात असता….नॅशनल हायवे 53 आराध्या पेट्रोल पंप जवळ नैनपूर येथे थांबला असताना 20 ते 25 वर्षे वयोगटातील 4 अनओळखी आरोपीतांनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीने ट्रक जवळ येवुन त्यातील 1 आरोपी हा ट्रकवर चढुन फिर्यादीला धमकावून शिवीगाळ करून व इतर आरोपी यांनी ट्रक मधुन अंदाजे 175 लिटर डिझेल किमती 16,100/-रू.चा जबरीने चोरून नेल्याने फिर्यादीचे रिर्पाटवरून पो. ठाणे डूग्गीपार येथे अपराध क्र. 345/2024 कलम 309(4), 3(5) भा.न्या. संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता..

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करून गुन्हा उघड करण्याचे निर्देश पो.नि. डूग्गीपार तसेच पो.नि. स्थागुशा यांना दिले होते. पो. ठाणे. डुग्गीपार पोलीसांतर्फे तसेच पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातर्फे गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता…..स्थागुशा चे पोलीस पथक गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध, व गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाने फिर्यादी यांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन, गोपनीय बातमीदाराने दिलेली माहिती तसेच गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत व गुन्हेगारांचे तांत्रीक विश्लेषण माहितीच्या आधारे महामार्गावर ट्रक चालकांना धमकावून डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार आरोपी नामे –

1) हिमांशु ऊर्फ पुटटु राजकुमार विश्वकर्मा वय 19 वर्ष रा. वार्ड नं. 15, खेरमाई मोहल्ला, नैनपुर, जि. मंडला, (म.प्र.),

2) सलमान बशीर खान वय 27 वर्ष. रा. राजीव कॉलोनी, देवदरा, मंडला, (म.प्र)

यांना नैनपुर जिल्हा- मंडला ( मध्यप्रदेश) येथून जेरबंद करून ताब्यात घेण्यात आले…दोघांनाही गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी विचारपूस केली असता दोघांनीही त्यांचे ईतर 5 साथीदार यांचेसह मिळुन गुन्हा केल्याचे कबूल करून सांगितले.. दोन्ही आरोपीतांचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दोन इनोव्हा चारचाकी गाड्या व डीझेल विक्रीचे पैसे, व इतर साहित्य असा एकूण किंमती 56,14,900/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्यातील ईतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे..

जेरबंद करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना गुन्ह्याचे पुढील तपास कायदेशीर कारवाई प्रक्रिया करीता पो. ठाणे डूग्गीपार पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे… पुढील तपास कायदेशीर कारवाई डूग्गीपार पोलीस करीत आहेत..

दोन्ही जेरबंद कऱण्यात आलेले गुन्हेगार हे अट्टल सराईत गुन्हेगार असून यांच्यावर ईतर जिल्ह्यात राज्यात, जबरी चोरी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे.. सदर बाबत सविस्तर तपास करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी श्री. विवेक पाटील यांचे मार्गदर्शनात स्थागुशा चे पोलीस निरीक्षक श्री दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक पो.उप.नि शरद सैदाने, पोलीस अंमलदार तुलसीदास लुटे, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, हंसराज भांडारकर, घनश्याम कुंभलवार यांनी अथक परिश्रम प्रयत्नांनी गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना जेरबंद करून कामगिरी केली आहे…. डूग्गीपार पोलीसांनी सुध्दा गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपी जेरबंद करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट