अंबड पो. स्टे मधील घरफोडीच्या ८ गुन्हयातील पाहीजे असलेला सराईत आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात.

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिक :- मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात घडलेल्या गुन्हयातील पाहीजे आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीकोनातुन विशेष मोहीम राबविली होती. अंबड पोलीस स्टेशन कडील १) 1 गु.र.नं. ७२८ / २०१९ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ३४, २) १ गु.र.नं. ६९० / २०१९ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ३४, ३) गु.र.नं. ६८९ / २०१९ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ३४, ४) गु.र.नं. ६८४ / २०१९ | भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ३४, ५) गु.र.नं. ६८७/२०१९ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ३४, ६) गु.र.नं. | ७०६/२०१९ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ३४, ७) 1 गु.र.नं. ६४२ / २०१९ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ३४, ८) 1 गु.र.नं. ६९६ / २०१९ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ३४ या एकुण ०८ गुन्हयातील पाहीजे आरोपी लक्ष्मण उर्फ | गब्बुलक्ष्या अंकुश गायकवाड हा गुन्हे करून ५ वर्षापासून पसार झालेला होता.
त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा, नाशिक शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पाहीजे आरोपींचा कसोशीने शोध घेत होते. नमुद गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी लक्ष्मण उर्फ गब्बुलक्ष्या अंकुश गायकवाड हा दि. ०३/०८/२०२३ रोजी सिन्नरफाटा, नाशिक येथे येणार असल्याची पोलीस नाईक ९११ दत्तात्रेय चकोर व पोलीस अंमलदार २३८९ भगवान जाधव यांना खात्रीशिर बातमी मिळाली होती.
मिळालेल्या बातमी प्रमाणे खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन पाहिजे आरोपी | लक्ष्मण उर्फ गब्बुलक्ष्या अंकुश गायकवाड, वय ३३ वर्षे, रा. सुंदर यांचे घरात भाडयाने, राजवाडा, पळसे गाव, ता. जि. | नाशिक यास दि. ०३/०८/२०२३ रोजी सिन्नरफाटा, नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास व कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त | सो. गुन्हे, मा. श्री. सिताराम कोल्हे, सपोआ गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना खाली खंडणी विरोधी पथकातील पोनि. | विदयासागर श्रीमनवार, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, श्रेपोउनि, दिलीप भोई, सपोउनि, दिलीप सगळे, पो. हवा. किशोर | रोकडे, राजेश भदाणे, पो.ना. योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पो. अंमलदार भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, भगवान जाधव व मपोशि. सविता कदम यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com