गोंदिया जिल्हा पोलीस दल व एच.डी. एफ. सी. बँक, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रम उत्कृष्ठ रित्या संपन्न…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाचे आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील एकुण 471 रक्तदात्यांनी रक्तदानाचे केले पुण्यकार्य आहे.

    🔹 दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी संविधान दिनानिमित्याने तसेच गोंदिया जिल्हयातील नक्षलग्रस्त प्रभावित भागात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना नक्षली हल्ल्यात शहीद झालेले गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी-पोलीस अंमलदार त्याचप्रमाणे मुंबई शहर येथे आंतकी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी- अंमलदार, निष्पाप नागरिक यांच्या स्मृती- प्रित्यर्थ लोक-कल्याण कार्यास सहकार्य व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, व अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा , यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक - 26 नोव्हेंबर 2023 रोज रविवारला जिल्ह्यातील 6 प्रमुख ठिकाणी-     

1) जिल्हा वाहतुक शाखा गोंदिया,
2) पोलीस उप-मुख्यालय देवरी,
3) पो.स्टे. आमगाव,
4) पो.स्टे. तिरोडा,
5) पो.स्टे. सालेकसा
6) पो.स्टे. अर्जुनी/मोर इत्यादि ठिकाणीं वेळ सकाळी 10.00 वाजता ते सायंकाळी 05.00 वाजता दरम्यान रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…..

          मा. नवनियुक्त अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्हा वाहतूक शाखेत आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमास  प्रामुख्याने उपस्थित राहून  जिल्ह्यांतील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे औपचारीक रित्या उद्घाटन केले........ तद्नंतर 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्याने थोड्क्यात माहिती दिली... तसेच मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात  व गोंदिया जिल्हयात नक्षली हल्ल्यांत शहीद झालेल्या पोलीस अधिकारी- कर्मचारी व नागरिक यांच्याबद्दल आपल्या संवेदना व्यक्त करत जिल्ह्यांतील सर्व जनतेला रक्तदानाच्या पुण्यकार्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून लोक-कल्याण कार्यास सहकार्य करण्याचे आणि रक्तदान करण्याचे आवाहन केले....  

           तद्नंतर सदरचे रक्तदान शिबीरात अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा, यांनी स्वतः रक्तदान केले....... त्याचप्रमाणे शिबिरात सहभागी गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी- अंमलदार, गृहरक्षक दल, तरुण- तरुणी, सामान्य नागरिक, प्रतिष्ठीत व्यक्ति यांनी जिल्ह्यांतील प्रमुख 6 ठिकाणीं आयोजित शिबीर कार्यक्रमात मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत 1) जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया-76, 

2) पोलीस उप- मुख्यालय देवरी -58,

3) पोलीस स्टेशन आमगाव-25,

4) पोलीस स्टेशन अर्जुनी/मो.-108,

5) पोलीस स्टेशन सालेकसा- 160,

6) पोलीस स्टेशन तिरोडा- 44

        अश्याप्रकारे जिल्ह्यातील एकुण - 471 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

          लोक-कल्याण कार्याच्या पुण्यकार्यात मोठ्या संख्येने उत्स्फूर्त पणे सहभागी होत रक्तदान करणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी- अंमलदार त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सामान्य नागरिक , युवक युवती, प्रतिष्ठित नागरिक यांना गोंदिया जिल्हा पोलीस दल एचडीएफसी बँक येथील उपस्थित वैद्यकीय चमू, डॉक्टर यांचे वतीने रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येऊन गौरविण्यात आले आहे....

        गोंदिया जिल्ह्यात विविध 6 ठिकाणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी अंमलदार यांचे अथक परिश्रमातून  शिबिर कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या आयोजन करण्यात आले.. विशेष सहकार्य एच. डी. एफ. सी. बँक गोंदिया येथील क्लसटर हेड श्री. दिपक पाटील, ब्रांच आपरेशन मॅनेजर श्री सुमित करमनकर, व मॅनेजर हरिश ठाकरे, डॉ. शुभम तुपकर, डॉ. पल्लवी चौरागडे, लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया येथील चेतन चव्हाण (टेक्निसियन सुपरवाईझर), राकेश भेलावे (पीआरओ), रंजना मेश्राम (नर्स), नेहा कटरे (टेक्निसियन), स्नेहा रामटेके (टेक्निसियन), रक्षणा बोरकर (टेक्निसियन), रुपेश पंधराम (सिनि. टेक्निसियन सुपरवाईझर), सुशांत पेंडारकर, जानकी बोपचे यांनी परिश्रम घेतले. 

           गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात उस्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या तसेच रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्या साठी अथक परिश्रम मेहनत घेवून सहकार्य करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी- अंमलदार त्याचप्रमाणे लोककल्याण कार्यास सहकार्य करण्याऱ्या सर्वांचे आभार मानलेत

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट