शासनाने निर्बंध केलेले सुगंधी तंबाखु व गुटख्याची अवैध वाहतुक करणारे आरोपी जेरबंद – ७,८१,२००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत…

उपसंपादक- रणजित मस्के
सांगली :-पोलीस स्टेशन मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
गु.घ.ता वेळ दि. २९.०४.२०२४ रोजी दुपारी १२.३० वा चे दरम्यान
अपराध क्र आणि कलम
गु.र.नं.२५७/२०२४ भादविसं कलम १८८, ३२८, ३४ अन सुरक्षा आणि मानके अधि- २००६ चे कलम ५९ प्रमाणे
फिर्यादी नाव
हणमंत किसन लोहार, पोहेकों / १०२५ नेम- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
गु.दा.ता वेळ ता. २९.०४.२०२४ रोजी १८.१९ वा.
माहिती कशी प्राप्त झाली पोहेकों / १०२५ हणमंत लोहार
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, पोहेकों / हणमंत लोहार, आमसिध्द खोत, अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, बाबासाहेब माने, अमर नरळे, संजय कांबळे, पोना / सोमनाथ गुंडे, पोशि / सोमनाथ पंतगे, सुनिल जाधव, अजय बंदरे, कॅप्टन गुंडवाडे.
अटक वेळ दि. २९/०४/२०२४ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
१. जयेश महिपती भगत, वय-२९ वर्षे, रा. भगत मळा, वडेरायबाग ता. कडेगाव जि. सांगली
२. हेमंत श्रीकांत वरुडे, वय-३२ वर्षे, रा. गणपती मंदिरा शेजारी, ब्राम्हण गल्ली, विटा ता. खानापुर जि. सांगली
जप्त मुद्देमाल
१. २,९९,५२०/- रु. किमतीचे लालसर काळसर रंगांचे केशरयुक्त विमल पान मसाला वर्ल्ड नं. १ असे मराठीत व इंग्रजी अक्षरात छापील असलेला पुढवाची किमंत १२० रु असे छापील कंपनी दराचे
२ एकुण २४९६ पुढे ८७,१२०/- रु. किमतीचे जाभळ्या रंगांचे केशरयुक्त विमल पान मसाला किंग पेंक, व वर्ल्ड नं. १ असे
मराठीत, इंग्रजी अक्षरात छापील असलेला एका पुड्याची किमंत १९८ रु असे छापील कंपनी दराचे एकूण ४४० पुढे. ३. ३६,०००/- रु किमतीचे खाकी रंगांचा आर एम डी पान मसाला असे इंग्रजीत लिहलेला पुठ्याचा बॉक्स
त्यात पांढऱ्या रंगांचा पुठ्याचे ४० लहान बॉक्स त्यावर उँचे लोग, उँची पसंद प्रीमियम आर एम डी पान मसाला असे मराठीत व इंग्रजीत अक्षरात छापील असलेला एका पुड्याची किमंत ९०० रु असे छापील कंपनी दराचे एकुण ५० पुढे.
७४,८८०/- रु किंमतीचे काळसर रंगांचे पुढे त्यावर व्ही टोबॅको असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला एका एकाची पुड्याची किमंत ३०२२ रु छापील कंपनी दराचे एकुण २४१६ पुढे.
९,६८०/- रु किंमतीचे गडद जांभळया रंगांचे पुढे त्यावर व्ही टोबॅको किंग पेंक हॅपी होली असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला एका पुडयाची किमंत २२ रु छापील कंपनी दराचे एकुण ४५० पुडे.
१२,४८०/- रु किंमतीचे खाकी रंगांचा बॉक्स त्यावर उँचे लोग, ऊँची पसंद एम सॅण्टेड टोबॅको गोल्ड असे इंग्रजीत लिहलेला असा, त्यात पिस्ता रंगांचे पुठ्याचे ४० लहान बॉक्स त्यावर उँचे लोग, उँची पसंद एम. सॅण्टेड टोबैको गोल्ड असे इंग्रजी अक्षरात छापील असलेला पुडा, एका पुडयाची किमंत ६०० रु छापील कंपनी दराचे एकूण ४० पुढे.
२,५०,०००/- किंमतीचे महिंद्रा कंपनीची एक पांढ-या रंगाची मॅक्झिमो माल वाहतुक गाडी तिचा आर टी ओ क्र. MH 10 BR 2660 असा जु.वा. किं.अं.
७,८१,२००/- (सात लाख ऐक्याऐंशी हजार दोनशे रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने अवैध धंद्याची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध गुटखा विक्री व वाहतुक करणाऱ्या लोंकाची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि. २९/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकातील पोहेकों / हणंमत लोहार यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, बेडग ते मिरज जाणारे रोडवरुन इसम नामे हेमंत श्रीकांत वरुडे हा जयेश महिपती भगत याचेसह त्याची महींद्रा मॅक्झीमो माल वाहतुक गाडी नं. एमएच-१०-बीआर-२६६० मधून बेकायदेशीरपणे, मानवी जीवनाला अपायकारक, शासनाने निबंध केलेले सुगंधी तंबाखु व गुटखा चोरुन विक्री करण्याकरीता वाहनातुन मिरज कडे घेवून जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, मिरज ते बेडग गावाकडे जाणारे रोडचे बाजूस असले श्री कुलस्वामिनी मंगल कार्यालयाचे समोर निगराणी करीत असताना, एक महींद्रा मॅक्झीमो माल वाहतुक वाहन नं. एमएच-१०-बीआर-२६६० हे बेडग ते मिरज जाणारे रोडने येताना दिसले. तसा त्या वाहनाचा बातमी प्रमाणे संशय आल्याने सदर वाहनास थांबणेचा इशारा करुन ते वाहन पोलीसांनी रस्त्याचे कडेला थांबवुन त्यातील वाहन चालकास पंचा समक्ष सपोनि सिकंदर वर्धन यांनी त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता वाहन चालकाने त्याचे नाव जयेश महिपती भगत वय-२९ वर्षे, रा. भगत मळा, वडेरायबाग ता. कडेगाव जि. सांगली असे असल्याचे सांगितले.
तसेच त्याचे बाजुस बसले इसमाने त्याचे नाव हेमंत श्रीकांत वरुडे वय-३२ वर्षे, रा. गणपती मंदिरा शेजारी, ब्राम्हण गल्ली, विटा ता. खानापुर जि. सांगली असे असल्याचे सांगितले. वाहन चालकांस त्याचे वाहनांमध्ये कोणता माल भरला आहे तसेच त्याची बिल पावती आहे काय याबाचत विचारणा केली असता त्याबाबत दोघांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काही एक समाधानकारक माहिती न देता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष मगदुम यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये वरील वर्णनाचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधी पान मसाला व सुंगधीत तंबाखु मुद्देमाल मिळुन आली. त्याचाचत त्यांचेकडे विचारणा केली असता, हेमंत वरुडे याने सांगितले की, सदर गाडी मध्ये सुगंधी पान मसाला व सुंगधीत तंबाखु असुन ती कुडची येथील प्रोप्रायटर पाटील पुर्ण नाच माहित नाही यांचे गोडावुन मधुन रिटेल विक्री करीता जयेश महिपती भगत याचेसह त्यांचेकडील गाडीतुन घेवुन जात असल्याची कबुली दिली.
सदर ठिकाणी मिळून आलेल्या मुद्देमालाचे अन्न व औषध प्रशासन विभाग, सांगलीचे अन्नसुरक्षा अधिकारी अनिल पवार यांनी पाहणी केली असता सदरचा माल अन्न व सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ प्रमाणे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याचे सांगितल्याने लागलीच सपोनि सिकंदर वर्धन यांनी गुटख्याचे रासायनिक तपासणीसाठीचे सॅम्पल काढून पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीवर मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com