युवा बॉईज प्रतिष्ठान अलकापुरी तर्फे पहीले प्रो कबड्डी लीग पर्व २०२४ मोठ्या उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी-मंगेश घडवले
नालासोपारा :– शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ह्य पर्वाचे उद्धघाटन माजी सभापती वसई -विरार महानगर पालिका मा. श्री . निलेश (दादा) देशमुख यांचा हस्ते पार पडले.
या लीग मध्ये ऐकून ६ संघानी आपला सहभाग नोंदवला .

संघमालक :- श्री. नितीन गोरीवले यांचा विघ्नेश्रवर संघ, संघमालक :- सौ. संगीता थोरात यांचा चिंतामणी संघ , संघमालक:- श्री. विपुल म्हामुणकर यांचा गिरिजातमक संघ, संघमालक :- श्री. सुभाष ढाफले यांचा बल्लाळेशवर संघ , संघमालक :- श्री. सचिन जाधव यांचा सिद्धीविनायक संघ आणि संघमालक :-श्री. पुष्पेंदु दास यांचा वरदविनायक संघ यांनी आपला सहभाग नोंदवला .




या प्रो कबड्डी लीग साठी इंडिया खेळाडू मा. आनंद वारंगे तसेच राष्ट्रीय खेळाडू मा. यश निंबाळकर सभागी झाले होते.
माजी नगरसेवक चंद्रकांत गोरीवले साहेब , संगीता थोरात , विजया तोरणकर , रेणुका सचिन जाधव , काशिनाथ कुऱ्हाडे यांनी या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.


अंतिम सामन्यासाठी विघ्नेश्वर संघ आणि बल्लाळेश्वर संघ यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यांत विघ्नेश्वर संघ हा विजयी ठरला.
सर्वकृष्ठ चढाई चा मान सुनील राठोड बल्लाळेश्वर संघ ,सर्वकृष्ठ पकडचा मान अक्षय गोवारे विघ्नेश्वर संघ यांना मिळाला तर सर्वकृष्ठ खेळाडूचा मानकरी ठरला विघ्नेश्वर संघाचा आकाश बावकर.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001