पोलीस क्रीडा स्पर्धा- 2024 चे रोमहर्षक रंगारंग आणि दैदिप्यमान आयोजन, आणि अतिसुंदर समारोपीय कार्यक्रम पोलीस मुख्यालय गोंदिया येथे संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के


गोंदिया:– “खेळातून घेई उंच भरारी, स्त्री शक्तीला साथ द्या सारी” या घोषवाक्यातून नागपूर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धाचे भव्य दिव्य रंगारंग असे दैदिप्यमान आयोजन पाहून डोळ्याचे पारणे फिटल्याच आणि “खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है” असे मनोगत व्यक्त करून नागपूर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा- 2024 चे यजमानपद भूषवलेले गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे रोमहर्षक डोळ्याचे पारणे फिटनाऱ्या भव्य दिव्य अश्या उत्तम आयोजना बद्दल गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कौतुक करून भविष्यात खेळाडूंनी आपली खेळाडूवृत्तीच्या जोरावर जिल्हा आणि राज्यस्तरावर तसेच नॅशनल स्तरावर दैदिप्यमान कामगिरी करून आप-आपल्या जिल्ह्याचा, परिक्षेत्राचा, आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा नावलौकिक करावा असे प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून लाभलेले- नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, मा. डॉ. श्री. दिलीप पाटील- भुजबळ सर, यांनी मनोगत व्यक्त करून समारंभ कार्यक्रमास उपस्थित सर्व पोलीस अधिकारी अंमलदार खेळाडूंचा, उत्साह द्विगुणित केला.

त्याच प्रमाणे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक मा. श्री. अंकित गोयल सर यांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व आणि खेळाडू विजेत्यांचे अभिनंदन कौतुक करून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्तमरित्या क्रीडा स्पर्धा पार पाडल्याबद्दल तसेच जिल्हास्तरीय, परिक्षेत्रीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा महत्त्वाची असते असे सांगत खेळाडूंना टीम स्पिरिट आणि मोटिवेशन वाढविण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून… भव्यदिव्य अतीसुंदर अशा आयोजनाबद्दल, बक्षीस वितरण व्यवस्था आणि समारोपीय कार्यक्रमा बद्दल गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे विशेष कौतुक केले.

       पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री . गोरख भामरे यांनी आपले प्रास्ताविक भाषणात दिनांक 11 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या दरम्यान पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया इंदिरा गांधी स्टेडियम तसेच क्रीडा संकुल गोंदिया येथे पार पडलेल्या नागपूर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर ग्रामीण, आणि वर्धा अश्या सहभागी 6 जिल्ह्याचे 200 महीला व 615 पुरुष एकूण 815 खेळाडूंनी सहभाग नोंदवून अत्यंत खेळीमेळी च्या वातावरणात क्रीडा स्पर्धा पार पाडल्याबद्दल आभार मानले. तसेच सर्व विजेत्यांचे अभिनंदन कौतुक करून पोलीस दलातील पोलीस अधिकारी-अंमलदार दिवस-रात्र अविरत कर्तव्य बजावत असतांना त्यांच्या अंगी खेळाडूवृत्ती जोपासली जावी, त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास व्हावा., ताण तणाव कमी व्हावा, त्यांच्यात एकोप्याची भावना निर्माण व्हावी अडी- अडचणीच्या सतत च्या ताणतणावातून काहीशी विश्रांती मिळावी,  या संकल्पनेतून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत मा. वरिष्ठांनी गोंदिया जिल्ह्यास नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल वरिष्ठांचे आभार मानलेत. 

        दिनांक 11-12-2024 ते 15-12-2024 या कालावधीत सांघिक क्रीडा प्रकारात फुटबॉल, हॉकी, हॅन्ड बॉल, बास्केट बॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, कुस्ती, तायक्वांदो, वु-शु आणि वैयक्तिक क्रिडा स्पर्धा प्रकारात ऍथिलिटिक्स (वैयक्तिक क्रिडा प्रकारात 100, 200, 400 व 800 मिटर धावणे, गोळाफेक, लांबउडी, भाला फेक, थाळी फेक, इत्यादी ) जुडो, वेटलिफ्टिंग, पावर लिफ्टिंग अशा 16 प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत... 

       समारोप कार्यक्रम प्रसंगी दोळके जांभळी येथील रावण डान्स ग्रुप च्या माध्यमाने अत्यंत सुंदर गोंडी नृत्याचे उत्कृष्ठ असे सादरीकरण करण्यात आले..त्याचप्रमाणे खेळाडू विजेत्यांचे आणि उपस्थितांचा आनंद द्विगुणित व्हावा या करिता  ऑर्केस्ट्रा चे आणि बडाखाना चे सुध्दा आयोजन करण्यात आले होते.

      गोंदिया जिल्हयात पार पडलेल्या नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा- 2024 मध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस महिला संघाने प्रथम सर्वसाधारण विजेतेपद पटकावले असुन चंद्रपूर जिल्हा पोलीस पुरुष संघाने  सर्वसाधारण प्रथम विजेतेपद पटकावले आहे..... अष्टपैलू बेस्ट ऍथलेटिक्स पुरुष खेळाडू- जिल्हा चंद्रपूर येथील पोलीस अमलदार - अभिषेक आडे याने सांघिक व वैयक्तिक खेळामध्ये 6 स्वर्ण, 1 रजत,1 कांस्य पदक असे एकूण 8 पदके जिंकले असून त्यास मा. प्रमुख पाहुणे यांचे हस्ते होंडा मोटार सायकल बक्षीस देण्यात आले..तर  अष्टपैलू बेस्ट ऍथलेटिक्स महिला खेळाडू यामध्ये गडचिरोली जिल्हा महिला खेळाडू अनिता शहारे हिने सांघिक व वैयक्तिक खेळामध्ये 4 स्वर्ण, 1 रजत, 2 कांस्य, असे एकूण 7 पदके जिंकले असून मा. प्रमुख पाहुणे यांचे हस्ते होंडा ॲक्टिवा मोटार सायकल बक्षीस देण्यात आले... तसेच वैयक्तिक खेळामध्ये उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून गोंदिया जिल्ह्य पोलीस दलातील- गायत्री बरेजू तर वैयक्तिक उत्कृष्ठ पुरुष खेळाडू म्हणून नागपूर ग्रामीण पोलीस दलातील पोलिस अंमलदार अमित मसरके याची निवड करण्यात आली असून दोघांनाही मा. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सायकल भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.... त्याचप्रमाणे सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारातील विजेत्या खेळाडू स्पर्धकांना मेडल सन्मानचिन्ह, भेटवस्तू पुरस्कार देऊन गौरव  करण्यात आला..

      नागपूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण व भव्य दिव्य, रंगारंग, दैदिप्यमान अविस्मरणीय असा समारोपीय समारंभ सोहळा रविवार दिनांक- 15/12/2024 रोजी 16.00 वाजता ते 20.00 वाजता दरम्यान  पोलीस कवायत मैदानावर मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला. यात सहभागी 6 जिल्ह्यातील पोलीस खेळाडू अधिकारी अंमलदार यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

     नागपूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस  प्रमुख पाहुणे म्हणून  विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर मा. डॉ. श्री. दिलीप पाटील- भुजबळ सर, पोलीस उप- महा, गडचिरोली परिक्षेत्र, कँप नागपूर मा. श्री. अंकित गोयल सर, तसेच पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरुल हसन, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री. हर्ष पोद्दार,  पोलीस अधीक्षक वर्धा श्री. अनुराग जैन,  पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर - रीना जनबंधू मॅडम प्रामुख्याने लाभलेत तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातील  पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव श्री प्रमोद मडामे, देवरी श्री. विवेक पाटील, गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर, तिरोडा श्री. साहिल झरकर, पोलीस उपाधीक्षक गृह नंदिनी चांनपूरकर गोंदिया जिल्ह्यातील 16 ठाण्याचे ठाणेदार, पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखा प्रमुख तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी- अंमलदार, खेळाडू, प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस अधिकारी अंमलदार यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने समारोपीय समारंभ कार्यक्रमास उपस्थित होते..

    सदर क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक बक्षिस वितरण पुरस्कार  सोहळा झाल्यानंतर सर्वांसाठी जेवणाची व ऑर्केस्ट्रा संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.... त्यामध्ये पोलीस अधिकारी अमलदारांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करून आनंद साजरा केला.... एकंदरीत पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांनी संपुर्ण क्रीडा स्पर्धेवर विशेष लक्ष देऊन त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, सर यांनी पोलीस खेळाडूंसोबत प्रत्यक्ष सक्रिय सहभाग नोंदवल्याने अतिशय उत्साही व आनंददायी वातावरणात सदरची क्रीडा स्पर्धा पार पडली.

   नागपूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा, यांनी संपुर्ण क्रीडा स्पर्धा उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल गोंदिया जिल्हा पोलीस दलातील, अधिकारी- अंमलदार, नियुक्त क्रीडा स्पर्धा समितीतील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे ग्राउंड तयार करण्यापासून ते सर्व स्पर्धा सुरळीत पार पडण्यापर्यंत अहोरात्र रात्रंदिवस अथक मेहनत करून अथक परिश्रम घेवून काम करणारे जिल्हा पोलीस दलातील, अधिकारी अंमलदार, खेळाडू. संघ प्रमुख, पंच, मार्गदर्शक, राहण्याची, जेवणाची, पाण्याची व्यवस्था, डेकोरेशन, लायटिंग, बैठक व्यवस्था, साहित्य सामुग्री पुरविणारे, तसेच पोलीस दलास प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मदत सहकार्य करणारे सर्वांचे आभार मानलेत..

   नागपूर परीक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा 2024 चे आयोजन  समारोपीय कार्यक्रम आणि बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती- मंजुश्री देशपांडे, मॅडम सेवानिवृत्त शिक्षिका गुरुनानक शाळा, गोंदिया यांनी केले. तर आभाप्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा सर यांनी करून सर्वांचे आभार मानलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट