धारदार शस्त्राने महिलेचा निर्घृण खून करणाऱ्यास आजन्म कारावासाची शिक्षा…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-▶️ मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश-1, न्यायालय गोंदिया, श्री. खान साहेब, यांचे आज दिनांक- 21/03/2024 रोजीचे आदेशान्वये महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून आणि गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्यास आजन्म…. कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे..*
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, यातील फिर्यादी श्री. तेजराम तुलाराम सेलोकर, वय 45 वर्ष, रा. खैरलांजी, ता. तिरोडा, जि. गोंदिया.यांची मृतक पत्नी सौ. अंतकला तेजराम सेलोकर, वय 43 वर्ष, ही खैरलांजी येथील शेतात घटना दिनांक- 10/04/2019 रोजी सकाळी गुरे चारण्यासाठी गेली असता घटना वेळ 10.00 ते 10.30 वाजता चे सुमारास यातील आरोपी नामे – यशवंत भाऊलाल लिल्हारे, वय 27 वर्ष, रा. पिपरीया. ता. तिरोडा, जि. गोंदिया. याने धारदार शस्त्राने गळ्यावर व डोक्यावर वार करून जखमी करून गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले होते……सदर प्रकरणी प्रथमतः कलम 394, 397 भादंवि. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला… महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने गुन्ह्यांत कलम 302 भादंवि अन्वये कलमवाढ करण्यात आले होते..पो . स्टे. दवनीवाडा येथे अप. क्रं. 91/2019 कलम 394, 397, 302 भादंवि….अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते…
महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा अत्यंत निर्घृण खून केल्याने सदर कृत्याची दखल घेत मा. वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा तपास तातडीने व अत्यंत बारकाईने सखोल परिस्थितीजन्य, आणि भौतिक दुवे तपासून पुरव्यानिशी रीतसर करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या……
मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयातील आरोपी नामे- यशवंत भाऊलाल लिल्हारे, यास गुन्ह्यांत तातडीने अटक करण्यात आली…..आणि सदर गुन्ह्याचा रितसर तपास करण्यात आला……. गुन्ह्यात सबळ साक्षपुरावे, भौतिक दुवे, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून तपासाअंती आरोपीतांविरुध्द गुन्हा निष्पन्न झाल्याने मा. न्यायालयात गुन्ह्याचे दोषारोपपत्र तयार करुन दाखल करण्यात आले होते…मा. न्यायालयाकडुन सदर गुन्ह्याचे केस क्रमांक – 82/2019 अन्वये खटला चालविण्यात आला…
⏩ सदर गुन्ह्याच्या खटल्यामध्ये मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश- 1, न्यायालय गोंदिया, मा. श्री. खान, साो., यांनी निकाल दिलेला असून आज दिनांक- 21/03/2024 रोजी गुन्ह्यातील आरोपी नामे- यशवंत भाऊलाल लिल्हारे, वय 27 वर्ष, रा. पिपरीया यास खालील प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे–👇
▶️ कलम 302 अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा व रुपये 10000 /- आर्थिक दंड व दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास.
▶️ कलम 397 मध्ये 10 वर्ष कारावास व 10000/- रुपये आर्थिक दंड व दंड न भरल्यास 6 महिने कारावास याप्रमाणे मा. न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली आहे…..
⏩ सदर गुन्ह्याचा उत्कृष्ठ तपास- पोउपनि. जयदीप दळवी, पोस्टे. दवनीवाडा. यांनी केले आहे ….तर सदर खटल्याचे कोर्ट पैरवी म्हणून न्यायालयीन कामकाज पो.कॉ. श्रीकांत मेश्राम, पो. स्टे. दवणीवाडा यांनी काम पाहिले….
⏩ मा. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील- श्री. महेश चांदवानी, यांनी उत्तमरित्या सरकार पक्षातर्फे बाजू मांडली….
पोलीस अधीक्षक, मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा- श्री. साहिल झरकर, दवनिवाडा पोलीस निरीक्षक श्री. सतिश जाधव, यांनी सदर प्रकरणात न्याय मिळवून देण्याकरिता उत्कृष्टरित्या तपास कार्य करणारे अधिकारी, तपास कार्यात मदत करणारे सहभागी आणि न्यायालयीन प्रक्रियेत मदत करणारे पोलीस अंमलदार, सरकार पक्षातर्फे बाजू मांडणारे सरकारी अभियोक्ता श्री. महेश चांदवानी यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे…
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com