खळबळ जनक- पाच दिवस मिसिंग असलेल्या सचिनचा नदीत सापडला मृतदेह…

0
Spread the love

प्रतिनिधी-सचिन पवार

रोहा :- हत्या की आत्महत्या पोलिसांकडून कसून तपास सुरु…

शिंदे कुटुंबावर कोसळले दुःखाचे डोंगर, घटनेने रोहा शहर हादरले…

सचिन वैजनाथ शिंदे वय 30 वर्षे राहणार काजूवाडी खारी रोहा, सचिन हा दिनांक 4 जुलै रोजी सकाळी सात वाजल्याच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. त्याची मिसिंग तक्रार सचिन याचे वडील यांनी पाच जुलै रोजी रोहा पोलीसात नोंदवली होती. रोहा पोलिसांकडून आणि नातेवाईकांकडून त्याचा पाच दिवस कसून शोध चालू होता. अखेर आज दिनांक 10 जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास करंजवाडी डोंगरी येथील कुंडलिका नदीच्या खाडीमध्ये त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. याची माहिती रोहा पोलिसांना समजतात रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे.

या घटने मागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. हत्या की आत्महत्या याचा कसून शोध रोहा पोलीस करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट