माजी नगरसेवीकाच्या पतीचे अपहरण करून २० लाख रूपयाची मागणी मागणारे सराईत गुन्हेगारांना गावठी अग्नीशस्वासह मानपाडा पोलीसानी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
डोंबिवली (पुर्व) :- मानपाडा पोलीस ठाण्यांचे हददीत काका ढाबा पाठीमागे, सखुबाई पाटील नगर, कल्याण पुर्व येथे भाडयाने रूम घेवून ज्योतीष दाखविण्याचे बहाण्याने कट रचुन माजी नगरसेवका यांचे पती यांना विश्वासात घेवून त्यांना सदर ठिकाणी आणुन त्यांना बांधुन त्यांना देशी पिस्टल (कटटा) दाखवून त्यांच्याकडुन २० लाख रूपयाची मागणी केली असल्याने फिर्यादी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यांत दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजी नंबर १०७२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९, १२६, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे.




सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टिम तयार करण्यांत येवुन गुन्हयांतील आरोपीत यांचा सर्वोत्तपरी शोध घेण्यांत आला. गुप्त बातमीदार तसेच आरोपीताचे वर्णना नुसार आरोपीताचा शोध घेण्यांत येत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गुप्त बातमी वरून गुन्हयातील आरोपीत यांना कोळसेवाडी, तिसगाव नाका, चक्की नाका परिसरात सापळा रचुन त्यांना ताब्यात घेवून पकडुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांने गुन्हयांची कबुली दिली.
यातील आरोपीत नामे १) गिरीष रमेश खैरे, वय. ५० वर्ष, रा. सुलोचना निवास चाळ, रूम नं ०१, सप्तश्रृंगी बिल्डींगच्या बाजुला, शिवसेना ऑफिसच्यामागे, तिसगाव रोड, कल्याण पुर्व मुळ गाव मु. शिंगैवे, ता. नांदगाव, जि. नाशिक, २) विनयकुमार कृष्ण यादव उर्फ राघव वय २२ वर्षे धंदा प्लंबर रा. कल्याण फिरस्ता मुळ राहणार गाव रामनगर, पो. अयौली ता. भालपुर, थाना सोनहा जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश, ३) विनायक किसन कराडे वय ३५ वर्षे धंदा लिफट ऑपरेटर रा. मंगलराघोनगर, अशिर्वाद चाळ, रूम नं ५. साई बाबा मंदिरजवळ, तिसगावरोड, कोळसेवाडी, कल्याण पुर्व मुळगाव मु.पो मुर्तुजापुर ता.जि. अकोला यांनी आपसात संगणमत करून यातील फिर्यादी यांच्याकडुन रूपये २० लाखाची खंडणी उकळण्याचा फौजदारी कट रचुन त्यासाठी आरोपीत क. ०१ गिरीष रमेश खैरे यांनी फिर्यादीचे अपहरण केल्यावर त्याला डांबुन ठेवण्यासाठी एका इमारतीत रूम भाडयाने घेवून, फिर्यादीच्या अडचणी ओळखीच्या ज्योतीषाकडे म्हणजेच आरोपीत क ०३ याच्याकडे गेल्यावर दुर होतील असा विश्वास फिर्यादीच्या मनात निर्माण करून, कट पुर्णत्वास नेण्यासाठी आरोपीत क. ०२ विनयकुमार यादव याच्याकरवी बिहार येथुन गावठी कटटा आणण्यासाठी त्यास रूपये १५ हजार देवून गावठी कटटा आणल्यानंतर आरोपीत क. ३ विनायक कराडे यास ज्योतीषी असल्याचा बहाणा करण्यास सांगुन आणि कट पुर्णात्वास नेण्यासाठी मिटींगा घेवून त्यानंतर दिनांक २४/०९/२०२४ रोजी ठरल्याप्रमाणे आरोपीत क ०१ गिरीष खैरे याने फिर्यादीस गुन्हयाच्या घटनास्थळी नेवून दोन्ही आरोपीतांच्या मदतीने खुर्चीला रस्सीने बांधुन फिर्यादी यांना गावठी कटटयाचा धाक दाखवून त्यांच्याकडुन रूपये २० लाखाची मागणी करून फिर्यादी अंगावरील रोख रूपये २७,०००/- आणि तीन महागडे फोन जबरदस्तीने काढुन घेवून निघुन गेले होते.
सदर आरोपीतांचा तांत्रिक साधणांच्या तसेच गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध घेवून त्यांना कोळेसवाडी, तिसगाव नाका, चक्की नाका परिसरातुन अटक केली असुन त्यांच्याकडुन २,५०,०००/- रू किंमतीचे तीन फोन, एक देशी बनावटीचे पिस्टल (कटटा) व एक जिवंत काडतुस असा मुददेमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री संजय जाधव साो, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण श्री अतुल झेंडे साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग श्री सुहास हेमाडे साो, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. जयपालसिंह गिरासे पोलीस निरीक्षक (का व सु), श्री. संपत फडोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेश राळेभात, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत आंधळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा/राजकुमार खिलारे, पोहवा/शिरीष पाटील, पोहवा/सुनिल पवार, पोहवा/संजु मासाळ, पोहवा/विकास माळी, पोहवा/दिपक गडगे, पोहवा/निसार पिंजारी, पोना/गणेश भोईर, पोना/प्रविण किनरे, पोना/यल्लापा पाटील, पोना/देवा पवार, पोना/अनिल घुगे, पोना/रवि हासे, पोशि/अशोक आहेर, पोशि/विजय आव्हाड, पोशि/महेद्र मंझा, पोशि/नाना चव्हाण, पोशि/घनश्याम ठाकुर यांचे पथकाने केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com