पोलादपुर मौजे भोराव येथे सरफराज सुलतान यांना चालत्या गाडीवरून पाडून मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

उपसंपादक-राकेश देशमुख
पोलादपूर:- पोलीस ठाणे पोलादपुर गुन्हा रजि.नं. १३७/२०२३ भा.द.वि. कलम :- ३४१,३२४,३२३ , ५०४, ५०६, ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दि . २७ / ११/ २०२३ रोजी रात्री १०.३० वा .चे . सुमारास मौजे भोराव गावाच्या हद्दीत महाड सवाद जाणार्या रस्त्यावर ता.पोलादपूर जि . रायगड .
येथे २८/११/२०२३ रोजी ३.०६ वाजता फिर्यादी श्री सरफराज सुलतान तारलेकर वाय :- २१ वर्ष रा . मुस्लीम मोहल्ला याना मारहाण करणारे आरोपी
०१ ) नईम अबुबकर तारलेकर वर्ष ४० रा . संवाद ता. पोलादपूर, जि . रायगड
०२ ) ताजीम अबुबकर तारलेक वर्ष २८ रा . संवाद ता. पोलादपूर, जि . रायगड यांच्यावरती सपोनी यु.एस. म्हसकर पोलादपूर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनात
तपासिक अंमलदार :- पोना/ २२९४ घुले पोलादपुर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हकीकत वरील तारखेस वेळी व ठिकाणी यांतील फिर्यादी हे महाड बाजुकडुन संवाद बाजुकडे त्यांच्या ताब्यातील टू व्हिलर पॅशन प्रो गाडी क्र.एम.एच.०६ बी सी ८२९७ हीच्या वरुन जात असताना भोराव गावच्या हद्दीत आलेवेळी यांतील वरील नमुद आरोपीत क्र.१ याने त्याच्या ताब्यातील सी.बी.झेड मोटारसायकल क्र.एम.एच.०६ ए व्ही ००२४ हिंच्यावरुन फिर्यादी यांच्या पाठीमागुन येवून हाताने फिर्यादी याचे मानेवर फटका मारला त्यामध्ये फिर्यादी हे गाडीवरुन खाली पडले त्यानंतर आरोपीत याने त्याच्या जवळ असलेले हेल्मेट फिर्यादी यांचे तोडावर मारुन दुखापत केली तसेच आरोपी क्र. २ हा देखील तेथे येवुन त्या दोघांनी मिळुन संगणमत करून, फिर्यादी यांना हाताबुक्क्यांनी मारहान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com