खडकेवाडा, ता. कागल गांवचे हद्दीत झालेले खुनाचा गुन्हा तात्काळ उघड, 02 आरोपी अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी..

उपसंपादक-रणजित मस्के
कोल्हापूर :इसम नामे स्वप्निल अशोक पाटील वय 27 रा. कौलगे ता. कागल जि. कोल्हापूर यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता दिनांक 17.01.2025 रोजी सकाळी 10.45 वा. चे पुर्वी डोक्यात गंभीर स्वरुपाची मारहाण करुन ठार केले. मयताची ओळख पटू नये तसेच पुरावा नष्ट करणेच्या हेतुने मयताचे डोकीत दगडाने जबर मारहाण करुन प्रेतावर ज्वलनशील पदार्थ टाकलेने प्रेत अर्धवट जळालेले स्थितीत मिळुन आलेने मयताचे वडील अशोक गंगाराम पाटील यानी दिले तक्रारी प्रमाणे मुरगुड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 14/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 238 प्रमाणे दि. 17.01.2025 गुन्हा दाखल आहे.मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत साो यांनी सदर गुन्ह्याचे गांभिर्य ओळखुन खुनाचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगूड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना त्यांचेकडील तपास पथके तयार करून सर्वतोपरी प्रयत्न करून तात्काळ गुन्हा उघडकीस आणणेच्या दृष्टीने सुचना देवून योग्य ते मार्गदर्शन केले.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविद्र कळमकर तसेच पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अमंलदार पोलीस अमंलदार युवराज पाटील, बालाजी पाटील, रोहित मर्दाने, विजय इंगळे, राजु कांबळे, समीर कांबळे, यशवंत कुंभार असे तपास पथक करून मा. वरिष्ठांनी दिलेले सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्हयाचा तपास सुरु केला.गुन्हा घडलेले ठिकाण हे अत्यंत निर्जनस्थळी असून तेथे कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अगर पुरावा मिळणेकरीता कोणत्याही प्रकारचे साधन नव्हते. परंतू तपास पथकाने मयत इसमाची माहिती, त्याचे मुळ गांवातील राहणेचे वर्तन, मृतदेह मिळालेले ठिकाण या सर्व ठिकाणी भेटी देवून तसेच तांत्रीक दृष्टया माहिती घेवून तपास सुरु केला, मुरगूड पोलीस ठाणे सहा. पोलीस निरीक्षक करे यांनी पोलीस पाटील व स्थानिक लोकांच्या मदतीने मयताचे नांव स्वप्निल पाटील असे असल्याचे निष्पन्न केले. गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार रोहित मर्दाने व विजय इंगळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मयत स्वप्निल अशोक पाटील व त्याचे गावातील आशितोष पाटील व आणखीन एक इसम, असे तिघेजण दिनांक 15.01.2025 रोजी रात्रौ एकत्र होते व त्यानंतरच मयत स्वप्निल पाटील हा घरी आलेला नाही. अशा मिळाले माहितीचे आधारे आशितोष पाटील याचा शोध घेवून त्यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेवून त्याचेकडे कौशल्यपुर्ण सखोल तपास केला असता त्याने गुन्हा केलेचे कबूल केले. तसेच त्याचे बरोबर सागर चव्हाण हा सोबत असल्याचे सांगीतले. सागर चव्हाण यास चिखली गांवातून ताब्यात घेतले. त्यांची नांवे अनुक्रमे 1) आशितोष उर्फ छोटया चंद्रकांत पाटील वय 25 रा. कौलगे ता. कागल जि. कोल्हापूर व 2) सागर संभाजी चव्हाण वय 34 रा. चिखली ता. कागल जि. कोल्हापूर अशी आहेत. त्यांचेकडे केलेल्या तपासात त्यांनी आरोपी नामे आशितोष उर्फ छोटया चंद्रकांत पाटील याचे चुलत बहिणीची मयत स्वप्निल अशोक पाटील याने सुमारे एक वर्षापुर्वी छेड काढली होती त्याचा राग मनात धरुन आरोपी आशितोष पाटील याने त्याचा मित्र सागर संभाजी चव्हाण याचे मदतीने मयत स्वप्निल अशोक पाटील याचे डोकीत दगड घालुन ठार मारुन मयताची ओळख पटू नये म्हणुन मोटर सायकल मधील पेट्रोल ओतुन पेटवुन देण्याचा प्रयत्न केले बाबत हकीकत सांगितली.मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व केलेले मार्गदर्शनाचे आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास टिमने सदरचा गुन्हा घडलेची माहिती मिळाले पासुन अवघ्या 04 तासात कौशल्यपुर्ण तपास करून सदरचा खुनाचा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मुरगुड पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी करे हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडीत साो, मा. अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, श्रीमती जयश्री देसाई मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग, श्री. सुजितकुमार क्षिरसागर साो, यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार रोहित मर्दाने, विजय इंगळे, युवराज पाटील, बालाजी पाटील, राजु कांबळे, समीर कांबळे, यशवंत कुंभार, नामदेव यादव व महादेव कु-हाडे यांनी केली आहे.