लग्नकार्यास आलेल्या दाम्पत्याचा भरकटलेल्या ३ वर्षीय बालकाच्या पालकांचा शोध घेवून त्यांना केले सुपुर्द…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– ▪️ याबाबत थोडक्यात असे की, नजीकच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हयातील नवेगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजा- लिंगा येथे राहणारे एक दाम्पत्य त्यांचा अल्पवयीन मुलगा वय 3 वर्षे सोबत दोन- तिन दिवसापुर्वी श्रीनगर गोंदिया येथे राहणारे त्यांचे नातेवाईकाचे घरी लग्नाला आले होते…. तेव्हा दिनांक – 21/02/2024 रोजी त्यांचा अल्पवयीन मुलगा हा मुलांसोबत खेळता खेळता शहरात भटकला. भटकत-भटकत तो मडी चौक येथे श्री. रिंकु आसवानी रा. सिंधी कॉलोनी गोंदिया यांना दुपारी 02.30 वाजता सुमारास रडतांनी दिसुन आला. त्यांनी सदर मुलास आपल्या ताब्यात घेवून मुलाच्या नातेवाईकांचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला परंतु मिळुन आले नसल्याने गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे माहिती देवून मुलास पोलीस ठाण्यास घेवून आले… सदर अल्पवयीन मुलास त्याच्या पालकांबाबत विचारपुस केली असता त्याने काहीही सांगितले नाही… गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ कदम व संजय पांढरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून लगेच शहरातील सोशल मिडीयावर मुलाची माहिती प्रसारित केली आणि त्यांच्या अधिनस्त कर्तव्यावरील अंमलदार व चार्ली पथकातील अंमलदार यांना सुचना देवून सदर मुलाच्या पालकांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले. त्यावरून गोंदिया शहर पोलीसांनी अवघ्या अर्ध्या तासातच तत्परतेने परिश्रम घेवून बालकाच्या पालकांचा शोध घेवून त्याला त्याच्या आईच्या सुपुर्द केले.. श्री. रिंकु आसवानी रा.सिंधी कॉलोनी गोंदिया, यांनी दाखवीलेल्या सामाजीक भान व कर्तव्यामुळे सदर अल्पवयीन मुलाला त्याच्या आईच्या सुपुर्द करण्यास व अनुचीत घटना टाळण्यात यश आले आहे ….
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कॅम्प देवरी, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्री. प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी सपोनि सोमनाथ कदम, सपोनि संजय पांढरे, सफौ. कोल्हारे, मपोना टेंभुर्णेकर, पो.शि सुमीत जैन, राकेश बंजारे, मरस्कोल्हे तसेच गुन्हे प्रगटीकरण येथील अंमलदार यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com