बेस्टच्या कंत्राटी बस चालक आणि वाहकांचा अचानक संपामुळे प्रवाशांचे हाल…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:– शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर दुपारी संघर्ष कामगार कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटी बस चालक सहभागी झालेले होते.

ह्या अश्या अचानक पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील बेस्ट बससेवेला त्याचा फटका बसल्याचे जाणवत आहे. बेस्टमध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना चांगले वेतन तसेच चांगल्या सुविधा मिळाव्या याकरिता हे सर्व कंत्राटी बसचालक आंदोलन करत आहेत.

मुंबई शहर तसेच उपनगरात बेस्ट उपक्रमाद्वारे आजमितीला १,८०० हून अधिक कंत्राटी बसेस चालवल्या जात आहेत आणि त्यापैकी बहुतांश रेल्वे स्थानकांबाहेरील फीडर तसेच मुख्य बसमार्गांवर चालवल्या जातात.

रोज जवळपास ३६ लाख दैनंदिन प्रवासी बेस्ट बसगाड्यांतून प्रवास करताना बेस्ट . बसेसच्या अपुऱ्या बसगाड्यांमुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. आता या आंदोलनामुळे सतत गर्दी असलेल्या बसमार्गांवर बसगाड्यांची आणखी कमतरता भासल्यास बसगाड्यांची वारंवारता कमी होऊन प्रवाशांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे . ह्या कंत्राटी बसचालक आणि बसवाहकांना नियमित कर्तव्यापासून दूर न राहण्याचा इशारा बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमातर्फे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तसेच उपक्रमातर्फे सर्व उपक्रमातील सर्व बस कंत्राटदारांना देखील त्यांच्या बसगाड्या नियोजित वेळापत्रकानुसार आगाराबाहेर प्रवर्तित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

“कंत्राटी कामगारांना समान काम, समान वेतन देण्याचे स्पष्ट निर्देश कामगार आयुक्तांनी बेस्टला द्यावेत, अशी आमची प्रमुख मागणी आहे. कंत्राटदार चालकाला दरमहा १८,००० रुपये ईतके मासिक वेतन मिळते, तर बेस्ट उपक्रमाच्या हजेरीपटलावरील कायमस्वरूपी बसचालकाला दरमहा ३४,००० रुपये इतके मासिक वेतन मिळते.आम्ही बेस्ट, खाजगी कंत्राटदारांना अनेक याचिका दिल्या आहेत, परंतु त्या सर्व व्यर्थ ठरल्या. आता आम्ही पुन्हा एकदा आमच्या मागण्या आयुक्तांसमोर मांडण्यासाठी सदर आंदोलन करत आहोत” असे संघर्ष कामगार संघटनेचे कामगार नेते शशांक राव यांनी आपली बेस्ट आपल्याचसाठी च्या प्रतिनिधींसोबत बोलताना सांगितले.

बेस्ट उपक्रमाने आर्थिकदृष्ट्या तोट्यात असल्याचे कारण देत मोठ्या दिमाखात स्वतःच्या उपक्रमात ह्या कंत्राटी बसगाड्यांची नांदी सुरु केली होती. परंतु सुरुवातीपासूनच ह्या कंत्राटी बसगाड्या, आणि त्यांच्या विस्कळीत सेवा, आग लागणे, त्यांची देखभाल हे प्रश्न कायमच चर्चेत राहिलेले आहेत. गेल्या ४ वर्षांत कित्येकदा कंत्राटी कर्मचाऱ्यांकरवी अनेक वेळा असे अचानक संप पुकारले गेलेले आहेत. जर ह्या कंत्राटीकरणामुळे, कंत्राटी कर्मचारी, बेस्ट च्या हजेरीपटलावरील कर्मचारी आणि मुख्यत्वे प्रवासी ह्यांपैकी कोणीही समाधानी नाहीत तर मग बेस्ट प्रशासन कोणाच्या मर्जीखातर ह्या कंत्राटदारांचे खिसे भरण्याकरिता प्रवासी तसेच कर्मचारी वर्गाला वेठीस धरत आहे असा प्रश्न निर्माण होतो.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट