द. ग तटकरे कॉलेज माणगांव येथे प्रांतधिकारी संदीपान सानप आणि तहसीलदार विकास गारुडकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल सप्ताह दिन साजरा …

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड

माणगांव :- महसूल सप्ताहाचा सुभारंभ दिप प्रज्वलाने मा. उप विभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या हस्ते करण्यात आला तसेच तहसील कार्यालय च्या आवारात “राज्य वृक्ष जारूळ”वृक्षारोपण करण्यात आले महसूल सप्ताह कार्यक्रमांतर्गत युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन द. ग तटकरे कॉलेज माणगाव या ठिकाणी आज रोजी डॉक्टर संदिपान सानप उपविभागीय अधिकारी माणगाव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

सदर कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले, मतदार नोंदणी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ई पीक पाहणी मोबाईल ॲप, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना,विविध सामाजिक योजना, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला शेतकरी दाखले आणि शासनाकडून जे कोणतेही मोठे अभियान राबविले जाते त्याची चोख व अंमलबजावणीकरणे महसूल विभागाचे काम असल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देने याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.सदर कार्यक्रमात माननीय उपविभागीय अधिकारी श्री संदिपान सानप सर, तहसीलदार श्री विकास गारुडकर, अपार तहसीलदार श्री विनायक घुमरे, निवडणूक नायब तहसीलदार श्री अरविंद घेमूड यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.कॉलेज अँबेसिडर, कॉलेज नोडल अधिकारी यांना कार्यवाही बाबत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या. नव मतदारांची नोंदणी करण्यात आली.

शासनाकडून येणाऱ्या नवनवीन योजना व प्रकल्पाचे नेतृत्व महसूल विभाग करते कायदा सुव्यवस्था आपत्ती व्यवस्थापन धान्य पुरवठा जमिनीविषयी बाबी इत्यादी विविध कामे महसूल विभागामार्फत केली जातात महसूल दिनाचे औचित्य साधून द ग तटकरे कॉलेज माणगांव येथे विविध प्रकराची माहिती माननीय उपविभागीय अधिकारी माणगाव श्री संदिपान सानप महसूल सप्ताहाची रुपरेषा सांगत होते.महसूल सप्ताहाच्या प्रथम दिवशी तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी माननीय उपविभागीय अधिकारी माणगाव श्री संदीपन सानप, तहसीलदार माणगाव श्री विकास गारुडकर, अपर तहसीलदार श्री विनायक घुमरे, माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, गट विकास अधिकारी संदीप जठार, मुख्याधिकारी माणगांव नगरपंचायत चे संतोष माळी व सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख, सर्व महसूल कर्मचारी उपस्थित होते

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट