वराठी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौं नम्रता नितीन लोखंडे यांचा बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश…

प्रतिनिधी- रेश्मा माने
महाड: महाड तालुक्यात सध्या 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजत असताना खाडी पट्ट्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या आणि 15 वर्ष बिन विरोध होत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत वराठीच्या निवडणुका लागल्या असता महाविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौं नम्रता नितीन लोखंडे यांनी आपल्या समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेतून म्हणजेच शिंदे गटातून, उद्धव बाळासाहेब ठाकरे ,शिवसेना ठाकरे गटात लोणेरे मांगरूळ येथे शिवसेना उपनेते श्री. विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्या संघटक संजय घोसाळकर यांच्या हस्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला .






यावेळी प्रवेश कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून गजानन अधिकारी, विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, युवासेना विभाग प्रमुख मोनीश टेंबे, विभाग प्रमुख शिवाजी गावडे सिकंदर आंबवनकर, महाड तालुका युवा नेते जमीर देशमुख, दत्त्ता शिंदे संदेश घासडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com