प्रलंबित असलेले प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगरच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन अखेर नगराध्यक्षा मा.उज्ज्वला काळे यांच्या हस्ते संपन्न..

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर:– डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पालघर पूर्व ग्रामस्थांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेले परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर पालघर,पूर्व येथील कमानीचे ( प्रवेशद्वाराचे ) भूमीपूजन पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मा. उज्ज्वला काळे यांच्या हस्ते दिनांक १ मार्च २०२४ रोजी डॉ आंबेडकर नगर पालघर (पूर्व) येथे पार पाडला.

सदरचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास नीधी योजना अंतर्गत मंजूर करण्यात आले असून या कामाची मंजुरी मिळविण्यासाठी रिपाई.(अ )पालघर जिल्हाध्यक्ष. सुरेश जाधव तसेच माजी नगरसेवक राजेश गायकवाड आणि डॉ.आंबेडकर नगर पालघर (पूर्व ) विकास समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, सचिव पुष्पाकर गायकवाड, राजेंद्र राऊत या मान्यवरांकडून सततचा पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला.
सगळ्यांच्या एकत्रित केलेल्या प्रयत्नामुळे कमानीच्या कामाची वर्क ऑर्डर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विक्रम गावंडे यांच्या कंपनीला देण्यात आली दि.०१ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता झालेल्या या भूमिपूजन सोहळ्याला नगराध्यक्ष सोबत उपनगराध्यक्ष उत्तम घरत, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव,नगरसेवक बंड्या म्हात्रे, नगरसेवक दिनेश गरट, नगरसेविका कु. हिंदवी पाटील, वेऊर नवली सोसायटी चेअरमन वीरेंद्र पाटील, जिल्हा प्रमुख- शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ॲड. निलेश राऊत, माजी नगरसेवक राजेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते (लोकपाल )छबिलदास गायकवाड, गावातील ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ गायकवाड,तसेच शरद जाधव, ॲड. निखिल राऊत,आनंद राऊत, सुनिल जाधव, राजन राऊत, पुष्पाकर गायकवाड, संदीप राऊत, अनिल गायकवाड,विकास गायकवाड, राजा राऊत, मंगेश उईके तसेच महिला ग्रामस्थ संध्या राऊत, अरुणा राऊत, वंदना जाधव, या सह स्थानिक ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात कमानीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com